AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neelam Gorhe | पंढरपूरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरची विकासकामे होणार, विधानसभा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंची ग्वाही

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, प्रस्तावित विकासकामे मार्गी लावण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाची प्रत कार्यालयाकडे सादर करावी, तीर्थराज कुशावर्तचे पाणी सतत शुद्ध राहायला हवे. त्यासाठी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा प्रस्ताव पाठविण्यात यावा.

Neelam Gorhe | पंढरपूरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरची विकासकामे होणार, विधानसभा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंची ग्वाही
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन आरती केली.
| Updated on: Apr 16, 2022 | 11:14 AM
Share

नाशिकः त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अनेक परवानग्या तांत्रिक बाबीमुळे केंद्रीय पुरातत्व विभागाकडे प्रलंबित आहे. तसेच देवस्थानची प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी पुरातत्व, नगररचना आणि पर्यावरण विभाग सोबत लवकर संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिले. त्र्यंबकेश्वर येथील देवस्थानचे विश्वस्त व अधिकारी यांच्याशी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) देवस्थानच्या विकासकामांचा आढावा घेऊन चर्चा केली. या बैठकीला इगतपुरी प्रांतअधिकारी तेजस चव्हाण, मुख्याधिकारी संजय जाधव, नायब तहसीलदार सतीश निकम, त्र्यंबकेश्वरचे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम, भूषण अडसर, सत्यप्रिय शुल्क, प्रशांत गायधनी, तृप्ती धारणे उपस्थित होते. डॉ. नीलम गोऱ्हे या नाशिक (Nashik) जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची पूजा केली. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराला फेरी मारून प्रदक्षिणा पूर्ण केली. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी देवस्थान ट्रस्टला 11 हजार एक रुपयांची देणगीही दिली.

एकूण 35 कामे

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अंतर्गत दुरुस्त्या, विकास कामे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या परवानगी न मिळाल्याने प्रलंबित आहे. जवळपास अशी एकूण 35 कामे आहेत. केंद्रीय पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्व विभाग यांच्यासोबत तांत्रिक मुद्यांवर चर्चा करून पंढरपूरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानची कामेही मार्गी लावले जातील. यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.

कुशावर्तचे पाणी शुद्ध ठेवा

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, प्रस्तावित विकासकामे मार्गी लावण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाची प्रत कार्यालयाकडे सादर करावी, तीर्थराज कुशावर्तचे पाणी सतत शुद्ध राहायला हवे. त्यासाठी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्यावर नगर विकास विभाग आणि पर्यावरण विभागाशी समन्वय साधू, असे त्यांनी सांगितले.

स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन करावे, जेणेकरून येणारे भाविक मोठ्या श्रद्धेने फळ, फुले अर्पण करतात. या घनकचऱ्याचे व्यवस्थापन देवस्थानने केले, तर भाविकांच्या भावना जपल्या जातील आणि त्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येईल. तसेच सौर ऊर्जा प्रकल्पाचा हे स्वतंत्र प्रस्ताव द्यावा, अशा सूचना त्यांनी प्रशासन आणि देवस्थान विश्वस्त मंडळास दिल्या.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.