शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना नांगरात अडकली नोटांनी भरलेली पोती; गोणी फुटल्याने नोटांचा खच पाहून शेतकरी हडभडला

हे धक्कादायक प्रकरण पटना जिल्ह्यातील पालीगंज उपविभागातील सिंगोडी पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. येथील पळसौदा गावात एका शेतकऱ्याच्या शेतात जमिनीतून नोट बाहेर पडल्या आहेत. याची माहिती मिळताच शेकडो ग्रामस्थ शेतात पोहचले. बघ्यांनी हातात मावतील एवढ्या नोटा घेवून धूम ठोकली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत सर्व नोटा घेऊन लोक पळून गेले होते.

शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना नांगरात अडकली नोटांनी भरलेली पोती; गोणी फुटल्याने नोटांचा खच पाहून शेतकरी हडभडला
वनिता कांबळे

|

Jun 28, 2022 | 9:54 PM

शेत नांगरात असताना एका शेतकऱ्यांना नोटांचा खजिना सापडला. नोटांनी भरलेल्या अनेक गोण्या या शेतकऱ्याला सापडल्या. मात्र, या सर्व चलानातून बाद झालेल्या 500 आणि हजारच्या जुन्या नोटा(Old notes) आहेत. शेतात नोटा सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शेतकऱ्याच्या शेतात या नोटा पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली. या नोटा पाहून शेतकरीही हडबडला आहे. पाटणा(Patna) येथील एका शेतकऱ्याच्या शेतात हा प्रकार घडला आहे.

हे धक्कादायक प्रकरण पटना जिल्ह्यातील पालीगंज उपविभागातील सिंगोडी पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. येथील पळसौदा गावात एका शेतकऱ्याच्या शेतात जमिनीतून नोट बाहेर पडल्या आहेत. याची माहिती मिळताच शेकडो ग्रामस्थ शेतात पोहचले. बघ्यांनी हातात मावतील एवढ्या नोटा घेवून धूम ठोकली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत सर्व नोटा घेऊन लोक पळून गेले होते.

काय आहे प्रकरण

सिंगोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसौदा गावात राहणारे अजय सिंग यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत होते. यावेळी त्यांच्या नांगरात काही तरी अडकले. त्यांनी खाली उतरुन पाहिले असता नांगरात नोटांनी भरलेल्या गोण्या अडकल्या होत्या. या सर्व गोण्या फुटून त्यातून नोटा बाहेर पडल्या होत्या. या पोत्यांमध्ये भारत सरकारने बंद केलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा खोचून खोचून भरलेल्या होत्या.

नोटा घेवून लोक पळाले

नोटांचा खच पाहून शेतकरी थक्क झाला. शेतात सर्वत्र जुन्या नोटा शेतात पसरल्या होत्या. शेतात नोटा सापडल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थ मोठ्या संख्याने जमा झाले. ग्रामस्थांची नोटा उचलण्यासाठी धावपळ झाली. ग्रामस्थ जमेल तितक्या नोटा घेऊन पळून गेले. अखेरीस पोलिसांना याची माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तो पर्यंत गावकरी सर्व नोटा घेवून पसार झाले होते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा कोणी जमिनीत लपवून ठेवल्या होत्या. याचा शोध पोलीस घेत आहेत. लुटलेल्या जुन्या नोटा परत मिळवण्यासाठी पोलिस विविध लोकांच्या घरांवर छापे टाकत आहेत. जे लोक नोटा घेऊन पळून गेले त्यांची ओळख पटवली जात असून पैसे कोणाचे आहेत आणि ते कधीपासून जमिनीत गाडले आहेत या पोलिस शोध घेत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें