AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमाचा अखेर एन्काऊंटर

बारुईपूर प्रकरणातील आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. सीन रिक्रिएशनसाठी नेण्यात आलं असता त्याने पोलिसांवर वार करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेलं असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमाचा अखेर एन्काऊंटर
प्रकरणातील मुख्य आरोपीImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 08, 2026 | 11:00 AM
Share

पश्चिम बंगालमधील बारुईपूर इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येतील मुख्य आरोपी प्रभाष मंडल याचा बुधवारी पहाटे पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. गुन्ह्याचं रिक्रिएशन करण्यासाठी पोलीस पथक आरोपीला घटनास्थळी नेत असताना त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. मध्यरात्री पोलीस पथकाने गुन्ह्याच्या रिक्रिएशनसाठी आरोपीला घटनास्थळी नेलं होतं. याचवेळी आरोपीने अचानक एका पोलिसाचं शस्त्र हिसकावून घेतलं आणि पोलीस पथकावर गोळी झाडली. त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने बारुईपूर रुग्णालयात नेलं असताना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

4 जुलै रोजी बेपत्ता झालेली मुलगी

सोमवारी पश्चिम बंगाल पोलिसांनी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बारुईपूर इथं एका 12 वर्षीय मुलीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली. पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याला शहरातील बाजारपेठ परिसरातून पकडलं. यामुळे या प्रकरणातील अटकेची एकूण संख्या तीन झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सहा सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे. पीडित मुलगी ही 4 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. एका मैत्रिणीसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी ती घराबाहेर गेली होती. जेव्हा मुलगी घरी परतली नाही, तेव्हा तिच्या कुटुंबीयांना पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. नंतर रविवारी, सूर्यपूर हाट परिसरातील एका तलावात तिचा मृतदेह सापडला. तिच्या डोक्यावर जखमा होत्या.

क्रूरतेचा कळस

आरोपीने तिच्यावर बलात्कार करून तिला जिवंतपणी तलावात फेकलं होतं, असं शवविच्छेदनातून उघड झालं. पाण्यात बुडाल्याने आणि अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप उसळला होता. संतप्त गावकऱ्यांनी बारुईपूर-जयनगर रस्ता अडवला, टायर जाळले आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली होती. बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर काही तासांतच या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने एका व्यक्तीला मारहाण करून ठार केलं. नंतर त्याची ओळख इंद्रजित मंडल अशी पटली.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांना सांगितलं की, तक्रार दाखल झाल्यानंतर तपासात एक टक्का जरी हलगर्जीपणा आढळला, तर कठोर कारवाई केली जाईल.

Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार