बीसीसीआयचा षटकार; माजी क्रिकेटपटू आणि माजी पंचांच्या पेन्शनमध्ये घसघशीत वाढ,‘इतक्या’जणांच्या मिळणार लाभ

BCCI शाह यांनी ट्विट केले की, "माजी क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना अधिकाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ झाल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. सुमारे 900 कर्मचारी या वाढीचा लाभ घेतील आणि सुमारे 75% कर्मचाऱ्यांना 100% वाढीचे लाभार्थी ठरतील.

बीसीसीआयचा षटकार; माजी क्रिकेटपटू आणि माजी पंचांच्या पेन्शनमध्ये घसघशीत वाढ,‘इतक्या’जणांच्या मिळणार लाभ
भारतीय क्रिकेट नियामक मंडळImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 11:31 PM

BCCI Pension Increase Of Former Cricketers: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक मोठी घोषणा करत माजी भारतीय क्रिकेटपटू आणि माजी पंचांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा करताना बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI secretary Jai Shah) यांनी सांगितले की, माजी क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि माजी सामना अधिकाऱ्यांचे पेन्शन बोर्ड वाढणार आहे. यामध्ये पुरुष आणि महिला क्रिकेटशी संबंधित 900 जणांचा समावेश करण्यात आला आहे. या माजी खेळाडूंना लवकरच या पेन्शनचा (Pension) लाभ मिळू लागेल.

BCCI शाह यांनी ट्विट केले की, “माजी क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना अधिकाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ झाल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. सुमारे 900 कर्मचारी या वाढीचा लाभ घेतील आणि सुमारे 75% कर्मचाऱ्यांना 100% वाढीचे लाभार्थी ठरतील.

हे सुद्धा वाचा

काळजी घेणे हे आपले कर्तव्य

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, “आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या आर्थिक हिताची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खेळाडू हे नेहमीच क्रिकेटची जीवनरेखा असतात आणि एक मंडळ म्हणून त्यांचे खेळाचे दिवस संपले की त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. पंच हे अनसिंग हिरो आहेत आणि बीसीसीआय त्यांच्या योगदानाची खरोखर कदर करते.”

कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “आमच्या क्रिकेटपटूंचे कल्याण, मग ते भूतकाळ असो किंवा वर्तमान, सर्वोच्च प्राधान्य आहे आणि पेन्शनची रक्कम वाढवणे हे त्या दिशेने एक पाऊल आहे. बीसीसीआय गेल्या अनेक वर्षांपासून पंचांच्या योगदानाची दखल घेत आहे. आणि भारतीय क्रिकेटसाठी त्यांच्या मेहनती सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. एकूण 900 कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून यामध्ये 75% पेक्षा जास्त लाभार्थ्यांना 100 टक्के वाढ मिळणार आहे.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण सिंग धुमाळ म्हणाले, “बीसीसीआय आज जे काही आहे ते आपल्या माजी क्रिकेटपटू आणि पंचांच्या योगदानामुळे. मासिक पेन्शनमध्ये वाढ झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे, जे आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या भविष्यासाठी महत्वाचे असेल.”

मासिक पेन्शन निश्चित

माहिती देताना बीसीसीआयने सांगितले की, ज्या खेळाडूंना पेन्शन म्हणून 15 हजार रुपये मिळत होते, त्यांना आता 30 हजार रुपये मिळणार आहेत. तर माजी क्रिकेटपटूंना 22 हजार 500 रुपये पेन्शन म्हणून मिळत होती. ती आता वाढवून 45 हजार रुपये मासिक करण्यात येणार आहे. याशिवाय माजी क्रिकेटपटू आणि सामना अधिकाऱ्यांसाठी 30 हजार ते 52 हजार 500, 37 हजार 500 ते 60 हजार आणि 50 हजार ते 70 हजार रुपये मासिक पेन्शन निश्चित करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.