AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बस चालवता, चालवता ड्रायव्हर अचानक हार्ट अटॅकने कोसळला, मग…VIDEO

किरण असं बस ड्रायव्हरच नाव असून तो 40 वर्षांचा होता. तो BMTC बस घेऊन निलमनगरहून यशवंतपूर येथे चालला असताना अचानक त्याच्या छातीत दु:खू लागलं. त्याची शुद्ध हरपली.

बस चालवता, चालवता ड्रायव्हर अचानक हार्ट अटॅकने कोसळला, मग...VIDEO
Bus Driver Heart Attack
| Updated on: Nov 07, 2024 | 12:27 PM
Share

सध्या कार्डिअक अरेस्ट आणि हार्ट अटॅकच प्रमाण प्रचंड वाढलं आहे. कार्डिअक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. सध्या हे जे प्रमाण वाढलय, त्याला आपली बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याच बोललं जातय. कार्डिअक अरेस्ट आणि हार्ट अटॅक कधी कुठे येईल, हे कोणीच सांगू शकत नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका बस ड्रायव्हरला स्टेअरिंगवर असताना अचानक ह्दयविकाराचा झटका आला. हा ड्रायव्हर बस चालवता, चालवता स्टेअरिंगवर कोसळला.

बंगळुरु महानगर परिवहन सेवेच्या बसमध्ये सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. किरण असं बस ड्रायव्हरच नाव असून तो 40 वर्षांचा होता. तो BMTC बस घेऊन निलमनगरहून यशवंतपूर येथे चालला असताना अचानक त्याच्या छातीत दु:खू लागलं. त्याची शुद्ध हरपली. तो स्टेअरिंगवरच कोसळला. सुदैवाने जवळच उभ्या असलेल्या कंडक्टरच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने लगेच स्टेअरिंगचा ताबा आपल्या हाती घेऊन बस थांबवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

कंडक्टरचा प्रसंगावधान दाखवून निर्णय

किरणला लगेच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर किरणला मृत घोषित केलं. BMTC च्या अधिकाऱ्यांनी कंडक्टरने जे प्रसंगावधान दाखवून निर्णय घेतला, त्याचं कौतुक केलं. BMTC च्या 7,635 कर्मचाऱ्यांपैकी 40 टक्क्यांपेक्षा जास्त 45-60 वयोगटातील आहेत. किरण कुमारच अकाली निधन झालं, हे जाहीर करताना आम्हाला खूप दु:ख होतय. 6 नोव्हेंबरला अचानक आलेल्या ह्दयविकाराच्या झटक्याने किरण कुमारच वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं. बंगळुरु महानगर परिवहन सेवा किरण कुमारच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असं BMTC ने स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. BMTC च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किरण कुमारच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचं सांत्वन केलं.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...