AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, DIG लेव्हलच्या अधिकाऱ्याने कैद्याच्या पत्नीकडून शरीरसुख घेतलं, त्याबदल्यात जन्मठेप भोगणाऱ्या नवऱ्याची तुरुंगातून सुटका

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाने एका कैद्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण तो मध्येच कारागृहातून सुटून बाहेर आला. या प्रकरणातून चक्रावून सोडणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धक्कादायक, DIG लेव्हलच्या अधिकाऱ्याने कैद्याच्या पत्नीकडून शरीरसुख घेतलं, त्याबदल्यात जन्मठेप भोगणाऱ्या नवऱ्याची तुरुंगातून सुटका
M Somashekar
| Updated on: Oct 06, 2026 | 8:41 AM
Share

बंगळुरू मध्यवर्ती कारागृहाच्या माजी मुख्य अधीक्षकावर जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याच्या पत्नीने गंभीर आरोप केला आहे. नवऱ्याची तुरुंगातून सुटका करण्याच्या मोबदल्यात तुरुंग अधिकाऱ्याने आपलं लैंगिक शोषण केलं असा आरोप तिने केला आहे. कारागृहाचा हा माजी मुख्य अधीक्षक सध्या कारागृह आणि सुधार सेवा विभागात डीआयजी म्हणून कार्यरत आहे. शंकर या कैद्याची सुटका केली, त्यावेळी श्री सोमशेखर माजी मुख्य अधीक्षक होते. 2018 सालचं हे प्रकरण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट आदेशाच्या आधारे ही सुटका करण्यात आली. नवऱ्याची सुटका करण्याच्या मोबदल्यात सोमशेखर यांनी आपलं लैंगिक शोषण केलं असा आरोप शंकरच्या पत्नीने पोलीस तपासात केला. जन्मठेपेची शिक्षा भोगणारा शंकर 13 नोव्हेंबर 2018 साली बंगळुरु मध्यवर्ती कारागृहातून कसा बाहेर आला, याचा तपास पोलीस करत होते. सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाने तो बाहेर आल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी तपास केला. त्यात सर्वोच्च न्यायालयाचा तो आदेशच बनावट असल्याचं लक्षात आलं.

कैदी शंकरच्या सुटकेसाठी तुरुंगातच काम करणारा कर्मचारी श्रीकांतने सुप्रीम कोर्टाचा बनावट आदेश बनवल्याचा आरोप पोलिसांनी केला. श्रीकांत शिक्षाप्राप्त कैदी विभागात एसडीए म्हणून काम करतो. शंकरच्या सुटकेमध्ये सोमशेखरने काय भूमिका बजावली त्याचा पोलीस तपास करत आहेत. शंकरच्या पत्नीने सोमशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलाय. सोमशेखर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रकरणाशी संबंधित माहिती लपवून ठेवली. सोमशेखर यांना कोर्टात हजर करण्यात आलं. पुढील चौकशीसाठी त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

बनावट आदेश काढला कसा

2004 साली चिकपेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाने शंकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. सुप्रीम कोर्टाचा बनावट आदेश काढला कसा यावर सध्या पोलिसांनी तपास केंद्रीत केला आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची अशी सुटका होणं ही एक अत्यंत गंभीर बाब आहे.

Follow Us
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?