सावधान! Cowin App च्या नावे होऊ शकते मोठी फसवणूक

आता कोरोना लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनच्या नावे फसवणूक होण्याची शक्यता आहे. (Big Alert covid-19 vaccine Registration fraud)

सावधान! Cowin App च्या नावे होऊ शकते मोठी फसवणूक
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 12:04 AM

मुंबई : एटीएम ब्लॉक करणे किंवा विमा पॉलिसीवर नफा मिळण्याच्या नावे आतापर्यंत अनेक सायबर गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र आता कोरोना लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनच्या नावे फसवणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सायबर सेलला अलर्ट केलं आहे. (Big Alert covid-19 vaccine Registration fraud)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला जर कोरोना लसीबाबत एखादा अज्ञात व्यक्तीचा फोन आला, तर तो तुम्ही उचलू नका. कारण या फोनवरुन तुम्हाला कोरोना लसीच्या रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड नंबर किंवा ओटीपी नंबरची माहिती विचारली जाते. जर तुम्ही ही माहिती दिली, तर तुमची फसवणूक होऊ शकते.

तसेच गेल्या काही दिवसांपासून Cowin नावाचे एक App गूगल प्ले स्टोअरवर पाहायला मिळत आहे. मात्र यासारखी अॅप डाऊनलोड करताना सावधानता बाळगा. कारण जर तुम्ही एखादे चुकीचे ॲप डाऊनलोड केले, तर तुमची खासगी माहिती चुकीच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते. ज्यामुळे तुमचे बँक अकाऊंट डिटेल्सही त्याच्या हाती लागू शकतात.

कोरोना लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनच्या नावे जर तुम्हाला एखादा फोन आला आणि त्याने तुमच्याकडे ओटीपी मागितला तर तुम्ही वेळीच सावधान व्हा. कारण जर तुम्ही त्याला ओटीपी सांगितला, तर तुमचे बँक अकाऊंट रिकामी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा.

व्हॉटसॲपद्वारेही फसवणूक

फेसबुक आणि व्हॉटसॲप द्वारेही तुम्हाला फसवू शकतात. कधीकधी हॅकर्स व्हॉट्सअॅप हॅक करुन तुमचा मोबाईल नंबर घेऊन तुम्हाला मॅसेज पाठवू शकतात.

अनेकदा तुमचे व्हॉट्सॲप हॅक करुन तुमच्या मित्रांकडून काही पैसे मागितले जाऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या फोनवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जर तुम्हाला फोनवरुन समोरील व्यक्ती मोबाईल कंपनीचा अधिकारी किंवा बँक अधिकारी असल्याचे सांगत असले, तर तुमच्यासोबत मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकांनी थोडीशी सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांतर्फे केले जात आहे.  (Big Alert covid-19 vaccine Registration fraud)

संबंधित बातम्या : 

अनोखं स्मार्ट वीज मीटर, रिचार्जपासून ऑन-ऑफपर्यंत सर्वकाही मोबाईलवर

PUBG ला टक्कर देण्यासाठी FAU-G गेम सज्ज, लाँचिंगची तारीख ठरली!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.