AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारताचा अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का; घेतला मोठा निर्णय

अमेरिकेनं भारतावर टॅरीफ लावल्यानंतर अमेरिका आणि भारतामधील संबंधात कटुता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत, त्यानंतर आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! भारताचा अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का; घेतला मोठा निर्णय
| Updated on: Sep 05, 2025 | 9:42 PM
Share

अमेरिकेनं भारतावर टॅरीफ लावल्यानंतर अमेरिका आणि भारतामधील संबंधात कटुता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे अनेक देश अमेरिकेवर नाराज असताना दुसरीकडे आता चीन, भारत आणि रशिया अधिक जवळ येताना दिसत आहेत. यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे, व्हाईट हाऊसला देखील या धोक्याची जाणीव झाली आहे.

दरम्यान टॅरिफ वार सुरू असतानाच आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. भारताची सर्वात मोठी सरकारी पेट्रोलियम कंपनी असलेल्या इंडियन ऑइलने (IOC) अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेऐवजी, इंडियन ऑईलनं नुकतंच नायजेरिया आणि आखाती देशांकडून तब्बल तीस लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेमध्ये असलेले कच्च्या तेलाचे उच्च दर आणि उपलब्ध असलेले विविध पर्याय यामुळे आता इंडियन ऑइलने अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी न करता नायजेरिया आणि आखाती देशांसोबत मोठी डील केली आहे.

कोणाकडून किती तेलाची खरेदी

समोर आलेल्या माहितीनुसार आयओसीने नायजेरीयाकडून तब्बल वीस लाख बॅरल तेलाची खरेदी केली आहे. तर या व्यतिरिक्त अबू धाबीमधून दहा लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी करण्यात आली आहे. नायजेरीयाकडून खरेदी करण्यात आलेलं कच्च तेल सप्टेंबर, ऑक्टोबर एंडिंगपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात इंडियन ऑइलने अमेरिकेकडून 50 लाख बॅरल तेल खरेदी केलं होतं, मात्र त्यानंतर आता या कंपनीने अमेरिकेतून तेल खेरदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे भारताला इतर देशातून कच्च्या तेलाची खरेदी केल्यास मोठी सूट मिळत आहे, दुसरीकडे अमेरिकेच्या तुलनेत वाहतूक खर्च देखील कमी असल्यानं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेकडून भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. त्यानंतर भारतानं हा मोठा निर्णय घेतला आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा