AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ट्रम्प यांनी फोडला आणखी एक बॉम्ब, भारताला सर्वात मोठा धक्का, देशभरात खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर टॅरिफ लावला, त्यानंतर एच1बी व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केली , दरम्यान आता ट्रम्प यांनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे, अमेरिकेच्या नव्या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! ट्रम्प यांनी फोडला आणखी एक बॉम्ब, भारताला सर्वात मोठा धक्का, देशभरात खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2025 | 6:49 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला, मात्र ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यानंतर देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. त्यानंतर चिडलेल्या ट्रम्प यांनी एच 1बी व्हिसावरील शुल्क अचानक प्रचंड प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला, याचा थेट मोठा फटका हा भारताला बसला आहे. H 1B व्हिसासाठी नव्या शुल्कानुसार आता तब्बल एक लाख डॉलर म्हणजे 88 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान टॅरिफ आणि व्हिसानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

अमेरिका आणि भारताच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाचा डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे आदेश लागू केले आहेत. या नव्या आदेशाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना बसणार आहे. अमेरिकेच्या सरकारने अमेरिकेमधील सर्व महाविद्यालयांना नुकताच एक मेमो दिला आहे. त्यामध्ये सरकारने काही अटी घातल्या आहेत, या अटींची पूर्तता करणाऱ्या महाविद्यालयांनाच सरकारी फंड उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामधील सर्वात महत्त्वाची जी अट आहे ती म्हणजे कुठल्याही महाविद्यालयांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांची संख्या ही 15 टक्क्यांपर्यंतच मर्यादीत असावी, त्यापेक्षा ती अधिक असू नये, असं म्हटलं आहे.

एवढंच नाही तर त्या-त्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक कॉलेजमध्ये कोणत्याही एका देशील पाच टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी असता कामा नये, असं देखील या आदेशात म्हटलं आहे. नव्या आदेशानुसार आता अमेरिकेतील कोणत्याच महाविद्यालयाला कुठल्याही एका देशातील पाच टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाहीये, हेच नियम विद्यापीठांना देखील लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान सरकारच्या या नव्या आदेशामुळे आता भारतीय विद्यार्थ्यांचं सर्वात जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण जगातील इतर देशांपेक्षा भारतीय विद्यार्थ्यांचं अमेरिकेत शिकायला जाण्याचं प्रमाण अधिक आहे. द वॉल स्ट्रीट जर्नच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर मर्यादा घालण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. एकीकडे भारतावर टॅरिफ लावण्यात आला आहे, दुसरीकडे एच 1बी व्हिसामध्ये देखील मोठी वाढ करण्यात आली आहे, आता त्याचवेळी ट्रम्प प्रशासनाने हा नवा आदेश काढला आहे, याचा मोठा फटका हा भारताला बसणार आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.