भारताच्या एअर स्ट्राईकनंतर आता श्रीलंकेनं टाकला मोठा डाव, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं
भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला, त्यानंतर भारतानं पाकिस्तानची रडार सिस्टिम देखील उद्ध्वस्त केली, दरम्यान पाकिस्तानला आता तिसरा मोठा धक्का बसला आहे.

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 25 भारतीय आणि 1 नेपाळी व्यक्तीचा समावेश होता. या हल्ल्याचा बदला भारतानं घेतला आहे, भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. भारताकडून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला. या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहे. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.
याला देखील भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला, त्यानंतर आता भारतानं पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे. सकाळपासून पाकिस्तानवर ड्रोन हल्ले सुरू आहेत, पाकिस्तानच्या बारा शहरांवर पन्नास ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत, याची जबाबदारी देखील भारतानं स्वीकारली आहे. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकची रडार सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती भारताच्या संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान भारतानं केलेला सर्जिकल स्ट्राईक, त्यानंतर पाकिस्तानमध्ये सुरू झालेले ड्रोन हल्ले आणि आता आणखी एक मोठं संकट पाकिस्तानवर कोसळलं आहे. भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान जागतिक मदतीकडे डोळे लावून बसला आहे. मात्र इथे पाकिस्तानला श्रीलंकेनं मोठा दणका दिला आहे. श्रीलंकेनं बाजी मारली आहे. वर्ल्ड बँकेनं श्रीलंकेला एक अब्ज डॉलरची मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इथे आता पाकिस्तानचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानची चारही बाजुनं कोंडी होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानला 9 मे रोजी वर्ल्ड बँकेकडून मदतीचा एक हाफ्ता मिळणार होता, मात्र भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर ही मदत मिळणार की नाही, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. पाकिस्तान वर्ल्ड बँक मदत करेल या भरोशावर बसला असतानाच दुसरीकडे श्रीलंकेच्या कुटनीतीचा मोठा विजय झाला आहे, पुढील तीन वर्षांमध्ये श्रीलंकेला तब्बल एक अब्ज डॉलरची मदत देण्याची घोषणा वर्ल्ड बँकेनं केली आहे. यातून श्रीलंकेत रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधा उभारली आहे.
