Explainer | काँग्रेसची भाजपशी लढाई, 2024 च्या मैदानात कसे करणार दोन ‘हात’?

Assembly Election 2023 | सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीचा सामना रंगला आहे. काँग्रेसला तिचे पूनर्वैभव प्राप्त करायचे आहे. तर भाजपला काँग्रेसचे अस्तित्व संपवायचे आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता उखडून फेकण्यात भाजपने कसर सोडली नाही. दक्षिणेसाठी भाजपला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. आता हा कमकुवत हात भाजपशी कसे दोन हात करणार, हा प्रश्न आहे.

Explainer | काँग्रेसची भाजपशी लढाई, 2024 च्या मैदानात कसे करणार दोन 'हात'?
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 8:04 AM

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : राजकारण आणि युद्धात शौर्यापेक्षा शहाणपणाची गरज असते, असे म्हणतात. नाहीतर अनेक शक्तीशाली योद्धांचा अभिमून्य होतो, हे वेगळं सांगायला नको. काँग्रेसबाबत कदाचित हेच तर होत नाही ना? अशी शंका राजकीय विश्लेषकांना येत आहे. काँग्रेस भाजपसोबतच्या लढाईत गुरफटली गेल्याने स्वतःसाठी या पक्षाला वेळच देत येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. काँग्रेसच्या अंतर्गत मोठी लढाई सुरु आहे. जुन्या, नवीन नेत्यांचा संघर्ष, रणनीतीकारांची कमतरता, अंतर्गत धुसफूस, एकमेकांविरोधातील गट-तट असे अनेक प्रवाह काँग्रेसमध्ये वाहत आहेत. त्याचा पक्षानेच समाचार घेणे आवश्यक आहे. दोन हक्काची राज्य हातची जाणे ही 2024 च्या तोंडावर मोठी हानी आहे. आता हा कमकुवत हात भाजपशी कसे दोन हात करणार, हाच खरा प्रश्न आहे.

आता हवी एकजूट

काँग्रेसमधील अनेक मतप्रवाहांची मोट बांधणे आवश्यक आहे. पक्षातील नेत्याची तोंड एकाच दिशेला कशी होतील, याचा विचार पक्ष नेतृत्वाने करणे आवश्यक आहे. मत मांडण्याचे स्वातंत्र्य असले तरी पक्षाच्या विचाराची एकमोट बांधणे आवश्यक आहे. राहुल गांधी यांच्या विचारांचा झेंडा  हाती घेतलेली कार्यकर्ते गल्ली-गल्ली पोहचतील, यासाठी आतापासूनच मोठा प्रयत्न करणे गरजेचे आहे. पक्षात भाजपशी लढण्यापूर्वी अंतर्गतच मोठी लढाई सुरु आहे. ही लढाई कधी संपणार आणि एका ध्येयाने पक्ष उतरणार याची कार्यकर्त्यांना मोठी प्रतिक्षा लागली आहे. संघटनेची बांधणी, विविध सेलची बांधणी, अनेक मुद्यांवर रस्त्यावर उतरण्याची तयारी यावर पक्षाने मंथन करणे आवश्यक आहे. कॅडरवर पक्षाने लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

हे सुद्धा वाचा

संघटित प्रयत्न आहे कुठे?

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षात जीव फुंकण्याचा प्रयत्न सुरु केलेले आहे. ते सातत्याने मोदी आणि संघाला आव्हान देत आहेत. भारत जोडो यात्रेने तळागाळात मोठा प्रभाव टाकला आहे. पण त्यापुढे संघटनेच्या पातळीवर, पक्षाच्या अजेंडावर नवीन विचार समोर आला नाही. राहुल गांधी यांच्या मागे नेत्यांची मोठी फळी उभारणे आवश्यक आहे. लवकरात लवकर तडफदार युवा नेतृत्वाला संधी देणे आवश्यक आहे. जुन्या जाणत्या आणि संघटनात्मक पातळीवर यशस्वी असलेल्या नेत्यांची मोट बांधणे आवश्यक आहे.

राजस्थान गेले हातचे

पाच वर्षांत अशोक गहलोत सरकारने चांगली कामगिरी बजावली. गॅस सिलेंडरचे दर असोत, नोकऱ्या असोत वा इतर अनेक पातळ्यांवर सरकारने चांगले काम केले. पण भ्रष्टाचार आणि अंतर्गत विवादाचा मोठा फटका राजस्थान सरकारला बसला. सचिन पायलट आणि गहलोत यांच्यातील वादावर प्रभावी तोडगा निघाला नाही. घरगुती भांडणात सरकार गडगडले. भाजपने त्याचा फायदा घेतला आणि एक धक्का और दोचा नारा दिला. सत्ता खेचून आणली.

मध्यप्रदेशात जोरकस प्रयत्न नाही

मध्यप्रदेशात काँग्रेसने चांगला जनाधार कमावला. पण तो सत्ता समीकरणात त्यांना बदलवता आला नाही, हे संघटनेचे मोठे अपयश म्हणावे लागेल. राज्यातील नेतृत्वावाला केंद्रीय संघटनेचा पाठिंबा नसल्याचेच एकूण चित्र होते. तुम्ही लढा, आम्ही गंमत पाहतो, असा प्रकार झाल्याचे तोंडसूख राजकीय विश्लेषक घेत आहेत. भाजप कमजोर होत असताना, त्यांचे भांडवल करण्यात आणि प्रभावीपणे मुद्दे मांडण्यात काय चुकले याचे मंथन काँग्रेसने करणे गरजेचे आहे. मध्यप्रदेशात कमल फुलले आणि कमलनाथ एकटे पडले.  या पराभवात काँग्रेसला बाजीगर पण होता आले नाही, यापेक्षा अधिक दुः ख काय असेल, नाही का?

भूपेश यांच्या जीवावर निवडणूक

भूपेश बघेल यांनी छत्तीसगडमध्ये एक हाती किल्ला लढवला म्हटले तर वावगे ठरु नये. बघेल यांनी काँग्रेसला ओढण्याचा प्रयत्न केला. संघटनात्मक पातळीवर आणि जातीय गणित जुळवण्यात त्यांना मोठे अपयश आले. सहज सत्ता येईल, ही हवाच त्यांना घातक ठरली. सत्ता गेल्यानंतर भाजपने गेल्या पाच वर्षांत संघटनात्मक पातळीवर बरीच मेहनत घेतली. ओबीसी मतांना सुरुंग लावण्यात भाजपला मोठे यश आले. आदिवासी मतांची बिदागी पदरात पाडून घेतली. काँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला.

इंडिया आघाडीचा फायदा किती?

काँग्रेसने देशातील झाडून अनेक पक्षांची मिळून इंडिया आघाडी तयार केली. पण या आघडीचे अस्तित्व आणि प्रभाव काय असा प्रश्न आता विचारला जात आहे. जागा वाटपापासून ते प्रचारापर्यंत कुठेच या आघाडीचे अस्तित्व दिसले नाही. हे मोठे अपयश म्हणावे लागेल. लोकसभा 2024 मध्ये भाजपपेक्षा या आघाडीतच दंगल होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहे.

या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.