AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन तिकीट बुक करण्याच्या नियमात मोठा बदल, १ ऑक्टोबरपासून नवे नियम लागू

भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुकींगच्या नियमात येत्या १ ऑक्टोबर २०२५ पासून मोठा बदल केला आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

ऑनलाईन तिकीट बुक करण्याच्या नियमात मोठा बदल, १ ऑक्टोबरपासून नवे नियम लागू
| Updated on: Sep 15, 2025 | 9:33 PM
Share

Online Train Ticket Booking Rules: रेल्वेची तिकीटे ऑनलाईन बुक करण्याचा नियम बदलणार आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून कोणत्याही ट्रेनसाठी ऑनलाईन बुकींग सुरु झाल्यानंतर सुरुवातीची १५ मिनिटे केवळ आधार व्हेरीफाईड युजर्सनाच IRCTC वेबसाईट वा एपच्या माध्यमातून जनरल आरक्षण तिकीटांची बुकींग करता येईल. योग्य व्यक्तींना तिकीटांच्या बुकींगचा लाभ मिळावा यासाठी रेल्वे मंत्रालयाने ही योजना आखली आहे.

सध्या भारतीय रेल्वेच्या संगणीकृत पीआरएस काऊंटरद्वारा जनरल आरक्षित तिकीटांच्या बुकींगच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. जनरल आरक्षण सुरु झाल्यानंतर १० मिनिटांचा प्रतिबंध असण्याच्या वेळेतही बदल झालेला नाही. या दरम्यान भारतीय रेल्वेच्या अधिकृत एजंटांना पहिल्या दिवशी तिकीट आरक्षित करण्याची परवानगी नसते. सध्या या प्रकारचा नियम केवल तत्काळ बुकिंगवर लागू आहे. सामान्य रिझर्व्हेशनसाठी बुक रोज रात्री १२.२० वाजता सुरु होते आणि ११.४५ वाजेपर्यंत चालते.जनरल तिकीटांची आगाऊ बुकींग प्रवासाच्या तारखेच्या ६० दिवस आधी करावी लागते.

उदाहरण पाहा कसा नियम असेल

उदाहरणार्थ समजा तुम्हाला नवी दिल्ली ते वाराणसी जाणाऱ्या शिवगंगा एक्सप्रेसने १५ नोव्हेंबरची तिकीट बुक करायची असेल तर ऑनलाईन तिकीट बुकींग १६ सप्टेंबर रोजी रात्री १२.२० वाजता सुरु होईल. आता रात्री १२.२० वा. ते १२.३५ वाजेपर्यंत या ट्रेनची तिकीटे तेच तिकीट बुक करु शकतील ज्यांचे आधारकार्ड व्हेरीफाईड आहे. जर तुमचे अकाऊंट आधारशी व्हेरीफाईड नसेल तर तुम्हाला बुकींग सुरु झाल्यानंतर रात्री १२.२० ते १२.३५ वाजेपर्यंत तिकीट बुक करता येणार नाही.

जुलैमध्ये तत्काल तिकीटांच्या बुकींगसाठी नियम लागू झाला

भारतीय रेल्वेने या वर्षी जुलैमध्ये ऑनलाईन तत्काल तिकीटांच्या बुकींगसाठी आधार व्हेरीफाईड बंधनकारक केले होते. या नियमानुसार आयआरसीटीसीच्या मोबाईल एप किंवा वेबसाईटवरुन ऑनलाईन तत्काळ तिकीट बुकींगसाठी युजरचे अकाऊंट आधार व्हेरीफाईड असणे गरजेचे केले आहे. जर तुमचे अकाऊंट आधार व्हेरीफाईड नसेल तर तुम्हाला ऑनलाईन तात्काळ तिकीट बुक करता येणार नाही.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.