UGC चा मोठी निर्णय; विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी खूषखबर; आता परीक्षेचं टेन्शन नसणार…

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या निर्णयामुळे आता प्रादेशिक भाषा आणि अभ्यासकांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कोणत्याही पदवीचा अभ्यास करतानाही त्याचा फायदा जाणवणार असल्याचे बोलले जात आहे.

UGC चा मोठी निर्णय; विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी खूषखबर; आता परीक्षेचं टेन्शन नसणार...
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 11:31 PM

नवी दिल्ली: विद्यापीठ अनुदान आयोगाने आता प्रादेशिक भाषांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. युजीसीच्या या निर्णयामुळे आता प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी सर्व केंद्रीय विद्यापीठांना उच्च शिक्षणात प्रादेशिक भाषांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत. एका पत्राद्वारे त्यांनी केंद्रीय विद्यापीठांना स्थानिक आणि प्रादेशिक भाषांचा अध्यापन आणि अध्यापनात प्रोत्साहन देण्यासाठी आवाहन केले आहे. त्यांच्या आदेशामुळे प्रादेशिक बोलींना प्रोत्साहन मिळणार आहे.

विद्यापीठाकडून एकादा विषय इंग्रजीतून शिकवला जात असला तरी विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेमध्ये परीक्षा देण्याची परवानगी विद्यापीठाने द्यावी, असंही या पत्राच्या माध्यमातून सुचवण्यात आले आहे.

यामुळे स्थानिक भाषांमधील अनुवादाला प्रोत्साहन मिळणार असल्याचा विश्वास विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.

अध्यापन आणि मूल्यमापन स्थानिक भाषांमध्ये केल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या त्या अभ्यासक्रमाशी अधिक चांगल्या पद्धतीने जोडले जाणार आहेत असंही या पत्राद्वारे नमूद करण्यात आले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या आदेशामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही प्रगती होणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच वेळी, यामुळे 2035 पर्यंत उच्च शिक्षणातील GER 27 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याबरोबरच यूजीसीच्या अध्यक्षांच्या या पत्राद्वारे विद्यापीठांना स्थानिक भाषांमध्ये शिकवण्यासाठी संदर्भित पुस्तकांची यादी, स्थानिक भाषा समजणाऱ्या आणि शिकवणारे प्राध्यापक, विद्यार्थ्यांना स्थानिक भाषांमध्ये उत्तरे लिहिता येत असल्यास, तसेच त्या माहितीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कृती आराखड्याचीही मागणी करण्यात आली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या निर्णयामुळे आता प्रादेशिक भाषा आणि अभ्यासकांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कोणत्याही पदवीचा अभ्यास करतानाही त्याचा फायदा जाणवणार असल्याचे बोलले जात आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.