AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big News: भारताचे पॅलेस्टाईनमधले राजदूत मुकूल आर्य यांचा संशयास्पद मृत्यू, घटनेची चौकशी सुरु, घात की नैसर्गिक मृत्यू?

जसंही हे दु:खद वृत्त समजलं तसं राष्ट्राध्यक्ष महमुद अब्बास आणि पंतप्रधान मुहम्मद शतेह यांनी पोलीस प्रशासन तसच सुरक्षा अधिकारी, आरोग्य अधिकारी यांना तातडीनं भारतीय राजदूतांच्या घरी पाठवण्याच्या सुचना दिल्या. त्यांच्या मृत्यूचं बारकाईनं निरिक्षण करण्यास सांगितलं गेलं

Big News: भारताचे पॅलेस्टाईनमधले राजदूत मुकूल आर्य यांचा संशयास्पद मृत्यू, घटनेची चौकशी सुरु, घात की नैसर्गिक मृत्यू?
भारताचे पॅलेस्टाईनमधील राजदूत मुकूल आर्य यांचा संशयास्पद मृत्यूImage Credit source: Social
| Updated on: Mar 07, 2022 | 7:42 AM
Share

भारताचे पॅलेस्टाईनमधले (Palestine) राजदूत मुकूल आर्य (Mukul Arya) यांचं काल रविवारी निधन झालंय. विशेष म्हणजे रामल्लातल्या भारतीय दुतावासात त्यांचा मृतदेह आढळून आलाय. आर्य यांचा मृत्यू नेमका कसा झाला याची माहिती अजून तरी पूर्णपणे दिली गेलेली नाही. पण परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आर्य यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलंय तर पॅलेस्टाईनच्या सरकारनं घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. मुकूल आर्य यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की काही घातपात केला गेलाय याचा तपास केला जातोय. त्याबद्दलची सविस्तर माहिती दिवसभरात मिळण्याची शक्यता आहे. मुकूल आर्य हे 2008 च्या IFS बॅचचे अधिकारी आहेत.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं ट्विट

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनीच मुकूल आर्य यांच्या निधनाचं वृत्त ट्विटरवर दिलंय. ते म्हणाले- भारताचे रामल्लामधले प्रतिनिधी मुकूल आर्य यांच्या निधनानं धक्का बसलाय. ते एक हुशार आणि तेजस्वी अधिकारी होते. खूप काही अजून त्यांच्यासमोर होतं. त्यांचं कुटूंब आणि नातेवाईकांप्रती माझी सहवेदना.

पॅलेस्टाईनची प्रतिक्रिया भारतीय प्रशासकिय सेवेतील अधिकारी मुकूल आर्य यांचा मृत्यू नेमका किती वाजता झाला याची अजून तरी माहिती नाही पण रामल्लामधल्या भारतीय दुतावासातच त्यांचा मृतदेह आढळून आलाय. त्यांच्या निधनाचं वृत्त ‘धक्कादायक आणि आश्चर्यकारक’ असल्याचं पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. त्यांनी जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये ते म्हणतात- जसंही हे दु:खद वृत्त समजलं तसं राष्ट्राध्यक्ष महमुद अब्बास आणि पंतप्रधान मुहम्मद शतेह यांनी पोलीस प्रशासन तसच सुरक्षा अधिकारी, आरोग्य अधिकारी यांना तातडीनं भारतीय राजदूतांच्या घरी पाठवण्याच्या सुचना दिल्या. त्यांच्या मृत्यूचं बारकाईनं निरिक्षण करण्यास सांगितलं गेलं. त्याच स्टेटमेंटमध्ये पुढं म्हटलं गेलंय-अशा कठिण आणि आणीबाणीच्या प्रसंगी जे काही करणं गरजेचं आहे ते करण्यासाठी सर्वजण तयारीत आहेत. पॅलेस्टाईनचं परराष्ट्र मंत्रालय राजदूत आर्य यांच्या निधनाने जी हाणी झालीय, वेदना झालीय त्याबद्दल दु:ख व्यक्त करतं. मुकूल आर्य यांचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी सर्व अरेंजमेंट केल्या जात असल्याचही प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आलंय.

कोण होते मुकूल आर्य? मुकूल आर्य हे पॅलेस्टाईनमध्ये भारताचे राजदूत होते. ते 2008 च्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी होते. याआधी त्यांनी रशियाची राजधानी मॉस्को आणि अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भारतीय दुतावासात जबाबदारी सांभाळलेली होती. यूनेस्कोत पॅरीसलाही ते भारताचे प्रतिनिधी होते. त्यांनी दिल्ली विद्यापीठ आणि जेएनयू म्हणजे जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता. त्यानंतर ते भारतीय परराष्ट्र सेवेत ज्वाईन झाले होते.

हे सुद्धा वाचा:

काबुलमध्ये ‘इस्राईल-पॅलेस्टाईन’ प्रमाणे युद्ध, रॉकेट हल्ले करत अमेरिकेला कोण आव्हान देतंय?

Video | मी फक्त 10 वर्षांची आहे, माहीत नाही काय करु? पॅलेस्टाईनवाल्या मुलीच्या व्हिडीओनं जग हळहळलं, युद्धाची दाहकता पुन्हा उघड

Video: पॅलेस्टाईन-इस्रायल वादावर काय म्हणाले होते वाजपेयी? त्यांच्या भाषणातली क्लिप व्हायरल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.