AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: पॅलेस्टाईन-इस्रायल वादावर काय म्हणाले होते वाजपेयी? त्यांच्या भाषणातली क्लिप व्हायरल

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सध्या रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. इस्रायलने गाझाच्या सीमेवर सैन्य उभे केलं आहे. (know what atal bihari vajpayee says about Israel-Palestine Conflict)

Video: पॅलेस्टाईन-इस्रायल वादावर काय म्हणाले होते वाजपेयी? त्यांच्या भाषणातली क्लिप व्हायरल
atal bihari vajpayee
| Updated on: May 16, 2021 | 12:41 PM
Share

नवी दिल्ली: इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सध्या रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. इस्रायलने गाझाच्या सीमेवर सैन्य उभे केलं आहे. तर गाझा येथील पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्याने भारताने त्याचा निषेध नोंदवला आहे. या संघर्षावर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईनच्या या संघर्षावर माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाची भूमिका काय असावी हे स्पष्ट केलं होतं. आज इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील रक्तरंजित संघर्ष सुरू झालेला असताना वाजपेयींच्या या संघर्षावरील भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (know what atal bihari vajpayee says about Israel-Palestine Conflict)

अटलबिहारी वाजपेयी यांचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खूप जुना आहे. ब्लॅक अँड व्हाईट असलेला हा व्हिडीओ पाहताच तो खूप जुना असल्याचं दिसून येतं. एका जाहीर सभेतील हा व्हिडीओ असून त्यात वाजपेयी इस्रायल आणि पॅलेस्टाईन बाबत भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. यावरून त्याकाळातही इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष शिगेला पोहोचलेला असल्याचं दिसून येत आहे.

वाजपेयी नेमकं काय म्हणाले?

मध्यपूर्वेबाबत ही स्थिती स्पष्ट आहे. अरबांच्या ज्या जमिनीवर इस्रायलने कब्जा केला आहे, ती जमीन खाली करावी लागेल. आक्रमकांनी आक्रमणातून मिळालेल्या फायद्याचा उपभोग घ्यावा हे आम्हाला आमच्या संबंधात मंजूर नाही. जो नियम आमच्यावर लागू आहे तो इतरांवरही लागू असेल. अरबांची जमीन त्यांना दिलीच पाहिजे. जे पॅलेस्टाईन आहेत, त्यांच्या उचित अधिकाराची पुनर्स्थापना झालीच पाहिजे, असं वाजपेयी या व्हिडीओत ठणकावून सांगताना दिसत आहेत.

आता भारताची भूमिका काय?

आता भारताने इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षावर चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रातील (UN) भारताचे कायम प्रतिनिधी, टी. एस. तिरुमूर्ती यांनी ट्विट केले होते की, हरम अल शरीफ / माऊंट टेम्पलमध्ये होणाऱ्या संघर्ष आणि हिंसाचाराबद्दल भारत मनापासून चिंता व्यक्त करतोय. शेख जर्रा आणि सिल्व्हान प्रदेशातील पॅलेस्टाईन लोकांना हुसकावून लावण्याबाबत भारतही तितकाच चिंतित आहे. भारताने सर्व पक्षांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आणि सुरक्षा परिषदेच्या ठराव 2334 चे पालन करण्याचे आवाहन केले ज्यामध्ये असे म्हटले आहे की, 1967 पासून पूर्व जेरुसलेमसह पॅलेस्टाईनच्या ताब्यात घेतलेल्या हद्दीत इस्रायलने अन्य वस्त्या उभारण्यास कायदेशीर मान्यता नाही. त्याचबरोबर दोन देशांचा तोडगा काढणे आणि चिरस्थायी शांतता आणण्यात हा एक मोठा अडथळा आहे. तिरुमूर्ती यांनी यावरही जोर दिला की, थेट शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी तातडीने पुन्हा संवाद सुरू करण्याची आणि दोन देशांनी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. (know what atal bihari vajpayee says about Israel-Palestine Conflict)

संबंधित बातम्या:

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षाबद्दल भारताची भूमिका काय?

जाणून घ्या काय आहे आयर्न डोम सिस्टम? ज्यामुळे इस्त्रायल अद्याप सुरक्षित

LIVE Video: इस्त्रायलच्या रॉकेट हल्ल्यात जेव्हा 14 माळ्याची बिल्डींग जमीनदोस्त होते

(know what atal bihari vajpayee says about Israel-Palestine Conflict)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.