Jaipur Crime : जयपूरमध्ये ‘त्या’ मृतदेहांबाबत मोठा खुलासा, व्हॉट्सअप स्टेटसमुळे उलगडले रहस्य

| Updated on: May 29, 2022 | 4:24 PM

सर्वात लहान असलेल्या कमलेशने वडिलांना फोन करुन सांगितले की, पती आणि इतर नातेवाईकांकडून मला मारहाण केली जात आहे आणि आपल्या जीवाला धोका आहे, असे सांगितले होते. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी पती व सासरच्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे, छळ करणे यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Jaipur Crime : जयपूरमध्ये त्या मृतदेहांबाबत मोठा खुलासा, व्हॉट्सअप स्टेटसमुळे उलगडले रहस्य
जयपूरमध्ये 'त्या' मृतदेहांबाबत मोठा खुलासा
Image Credit source: tv9
Follow us on

जयपूर : जयपूरजवळील दुडू परिसरात शनिवारी एका विहिरीत 3 महिलांसह 2 मुलांचे मृतदेह (Deadbody) सापडले होते. या प्रकरणी आज मोठा खुलासा (Revealed) झाला आहे. मयत तीन महिला बहिणी बहिणी होत्या. यापैकी एकीने व्हॉट्सअॅप (Whatsapp) स्टेटसद्वारे आत्महत्येचे संकेतही दिले होते. पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मीनो वस्तीत राहणाऱ्या या तीन महिला 25 मे रोजी बाजारात जाण्याच्या बहाण्याने मुलांसह घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्या घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यासह महिला आणि लहान मुले हरवल्याचे पोस्टरही लावण्यात आले होते. काली देवी (27), ममता मीना (23) आणि कमलेश मीना (20) या तीन बहिणी आणि त्यांची मुले हर्षित (4) आणि 20 दिवसांचे नवजात बालक अशी मृतांची नावे आहेत.

दोन बहिणी गरोदर होत्या

मोठी बहिण काली देवी होती. तिच्या दोन लहान बहिणी ममता आणि कमलेश या गर्भवती होत्या. 2005 मध्ये एकाच कुटुंबात तीन बहिणींचा लहान वयात विवाह झाला होता. तिघींचेही पती शेती व्यवसाय करतात. सासरचे लोक या तिघींचा खूप छळ करत होते, तिघींना बेदम मारहाणही करायचे, असा आरोप मयतांचा चुलत भाऊ हेमराज मीना याने केला आहे. लहान बहिण कमलेश कुणाशी तरी फोनवर बोलत होती. यावरुन तिचा पती मुकेशने एक दिवसआधीच तिला मारहाण केली होती.

एका पीडितेने व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत मरणाचे संकेत दिले

मयतांपैकी एका बहिणीने व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस टाकले होते, ज्यामध्ये लिहिले होते, “आमच्या पाच जणांच्या मृत्यूचे कारण आमचे सासरचे आहेत. आम्हाला मरायचे नाही, पण त्यांच्या छळापेक्षा आमचे मरण बरे. या सगळ्यात आमच्या आई-वडिलांचा काही दोष नव्हता.” 25 मे रोजी तीन बहिणींपैकी सर्वात लहान असलेल्या कमलेशने वडिलांना फोन करुन सांगितले की, पती आणि इतर नातेवाईकांकडून मला मारहाण केली जात आहे आणि आपल्या जीवाला धोका आहे, असे सांगितले होते. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी पती व सासरच्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे, छळ करणे यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार आरोपींविरुद्ध कलम 304 बी (हुंडा हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Big revelation about five bodies found in a well in Jaipur)

हे सुद्धा वाचा