ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, त्या वीस खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला पराभवाचा मोठा झटका बसला होता. त्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. वीस खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला पराभवाचा मोठा झटका बसला होता. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय झाला. दरम्यान या निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. आधी 58 आमदारांचा एक गट तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडला. या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देखील देण्यात आली. त्यानंतर आमदारापाठोपाठ वीस खासदारांच्या गटाने देखील ममता बॅनर्जी यांची साथ सोडली. या सर्व खासदारांनी नव्या पक्षात प्रवेश केला. दरम्यान त्यानंतर तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी या बंडखोर खासदारांविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये या सर्व बंडखोर खासदारांना अपात्र ठरवण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली होती.
या प्रकरणात सुनावणीदरम्यान आता ममता बॅनर्जी यांच्या गटाला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना या वीस बंडखोर खासदारांबाबत निर्णय घेण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना वेळेचं कोणंतही बंधन घालता येत नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. ओम बिर्ला यांना वेळेचं कोणंतही बंधन सुप्रीम कोर्टाकडून घालण्यात आलेलं नाहीये.
सरन्यायाधीश सूर्यकांत, जस्टिस जॉयमाल्या बागची आणि जस्टिस व्ही मोहना यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली आहे. आम्ही अशी आशा करतो की या प्रकरणावर लोकसभा अध्यक्ष लवकरात लवकर निर्णय घेतील, परंतु आम्ही त्यांना या प्रकरणावर त्यांनी लगेच निर्णय घ्यावा अशी सक्ती करू शकत नाही, असं यावेळी न्यायलयाने म्हटलं आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान या वीस खासदारांबाबत आता लोकसभा अध्यक्ष ओम बिरला हे कधी निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. या खासदारांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोगकडून तृणमूलचं चिन्ह देखील गोठवण्यात आलं आहे, त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. यावरून ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला होता.
