बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार, नड्डा, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांचा रॅलीचा धडाका!

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं आज बिहारमध्ये जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून रॅलीचा धडाका पाहायला मिळत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून नेत्यांची फौज उतरवण्यात आली आहे. तर तेजस्वी यादवही अनेक ठिकाणी 'सुपरफास्ट' रॅली करणार आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार, नड्डा, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांचा रॅलीचा धडाका!
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 11:51 AM

पाटना: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज थंडावणार आहे. त्यामुळं जवळपास सर्वच पक्षांचे बडे नेत्यांकडून विविध भागात आज प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि RJDचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह अनेक नेते आज शक्तिप्रदर्शन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारात एकमेकांवर जोरदार हल्ला केल्यानं ही निवडणूक अधिक लक्ष्यवेधी ठरली आहे. (Bihar Assemble Election campaign for first phase will end today )

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आज दोन रॅली होणार आहेत. दुपारी १२ वाजता औरंगाबाद तर ३ वाजता पुर्णिया इथं नड्डा यांची सभा होणार आहे. तर मुख्यमंत्री नितीश कुमार आज मुजफ्फरपूर, महुआ आणि मनहर अशा तीन ठिकाणी रॅली करणार आहेत.

शेवटच्या दिवशी बिहारमध्ये भाजपची फौज!

जे. पी. नड्डा यांच्यासह बिहारमध्ये आज भाजपचे अनेक नेते प्रचारासाठी उतरणार आहेत. भूपेंद्र यादव, अभिनेते आणि खासदार रवि किशन यांच्या आज चार रॅली होणार आहेत. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि संजय जैस्वाल यांच्यात प्रत्येकी ३ रॅली होणार आहेत.

तेजस्वी यादव यांच्या सुपरफास्ट रॅली!

दुसरीकडे RJD नेते तेजस्वी यादव भागलपूर, खगडिया, वैशाली आणि बेगुसराय इथं रॅली काढणार आहे. एकट्या भागलपूरमध्येच तेजस्वी यांच्या पाच रॅली आहेत. तर खगडीया आणि अन्य ठिकाणी प्रत्येकी ४ रॅलीमध्ये ते सहभागी होणार आहेत. तर काँग्रेस नेते राजीव शुक्ला आज बिहार निवडणुकीसंदर्भात दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

पहिल्या टप्प्यात ७१ जागांसाठी मतदान

बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबरला होणार आहेत. यामध्ये विधानसभेच्या ७१ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार ६६ उमेदवारांचं भवितव्य वोटिंग मशिनमध्ये बंद होईल. तर १४ लाख 6096 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

बिहारमधील सध्याचे राजकीय बलाबल

  • एनडीए : 125
  • राजद : 80
  • काँग्रेस : 26
  • सीपीआय : 3
  • एचएएम : 1
  • एमआयएम : 1
  • अपक्ष : 5
  • खाली : 2
  • (एकूण जागा 243 सीट)

संबंधित बातम्या:

आमचा पक्ष सत्तेत आल्यास नितीश कुमारांना तुरुंगात टाकू- चिराग पासवान

बिहारमध्ये प्रचारादरम्यान गदारोळ, जनता दल राष्ट्रवादी पार्टीच्या उमेदवारावर गोळीबार

दोन कोटी लोकांना रोजगार का मिळाला नाही? बिहार विधानसभेच्या मैदानात राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

Bihar Assemble Election campaign for first phase will end today

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.