बिहारमध्ये आज शेवटची लढाई; मतदानाला सुरुवात; नवा रेकॉर्ड बनवण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे.

बिहारमध्ये आज शेवटची लढाई; मतदानाला सुरुवात; नवा रेकॉर्ड बनवण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 10:51 AM

पाटना : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या (BIHAR ASSEMBLY ELECTION 2020) अंतिम टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघांमध्ये आज (7 नोव्हेंबर) सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील मतदार आज एकूण 1 हजार 208 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासह आज वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक आहे. या ठिकाणी 7 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील मतदारांना मतदानाचा नवा रेकॉर्ड बनवण्याचे आवाहन केले आहे.

नरेंद्र मोदींनी ट्विट केले आहे की, बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सुरु आहे. सर्व मतदारांना माझी विनंती आहे की, सर्वांनी जास्तीत-जास्त संख्येत मतदान करुन लोकशाहीच्या या सोहळ्याचे भागीदार बना. मोठ्या संख्येंने मतदान करुन नवा रेकॉर्ड प्रस्थापित करा. सर्वांनी मास्क लावा आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत बिहारमधील मुजफ्फरपूर मतदारसंघात सर्वाधिक 28 उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. तर जोकीहाट, बहादूरगंज, त्रिवेणीगंज आणि ढाका या मतदारसंघात प्रत्येकी 9 उमेदवार आमने-सामने आहेत. सीमांचल या मुस्लीम बहुल भागात जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर यादव बहुल कोसी आणि ब्राह्मण बहुल मिथिलांचलमधील काही जागांवरही ‘कांटे की टक्कर’ होण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या टप्प्यात महाआघाडीतून काँग्रेसचे 25 तर RJDचे 46 उमेदवार रिंगणात आहेत. तर NDA कडून भाजप 35 जागांवर आणि JDU 37 जागी लढत आहेत. 5 ठिकाणी सीपीआय (माले), तर 2 ठिकाणी सीपीआयने आपले उमेदवार उतरवले आहेत. याचबरोबर VIP 5 तर हम एका जागेवर निवडणूक लढवत आहे. तर AIMIM च्या असदुद्दीन ओवेसी यांनी जवळपास 2 डझन जागांवर दंड थोपटले आहेत.

नितीश कुमारांवर भरसभेत कांदाफेक

विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार निवडणूक प्रचारासाठी 3 नोव्हेंबर रोजी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील हरलाथी विधानसभा क्षेत्रात गेले होते. यावेळी भाषण करत असताना एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर कांदे फेकले. यावेळी त्या व्यक्तीने भर प्रचारसभेत नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

“बिहारमध्ये बिंधास्तपणे मद्यविक्री होत आहे. तस्करी केली जात आहे. पण तुम्ही काहीच करु शकत नाही”, अशाप्रकारची घोषणाबाजी नितीश कुमार यांच्यावर कांदा फेकणाऱ्या व्यक्तीने केली. यावेळी नितीश कुमार यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, “फेकू द्या, जेवढं फेकायचं आहे तेवढं फेकू द्या”, असं नितीश कुमार म्हणाले. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण पुन्हा सुरु ठेवलं.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 53 टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात जवळपास 53.51 टक्के इतके मतदान झाले. 94 मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानप्रक्रियेत मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, तेजस्वी यादव, लोजप प्रमुख चिराग पासवान या दिग्गज नेत्यांनी मतदान केले. तर तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यासह 1450 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. 10 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. बिहारमध्ये काँग्रेस आणि आरजेडी विरुद्ध भाजप आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दल युनायटेड (JDU) यांच्यात लढत होत आहे.

संबंधित बातम्या

Bihar Elections 2020 | मतदान करणं गरजेचंच, पण EVM वर लक्ष ठेवणंही आवश्यक : शत्रुघ्न सिन्हा

बिहारमध्ये बदलाचे वारे? भरसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांवर पुन्हा ओढावली नामुष्की

Bihar Election | बिहारचे नवे मुख्यमंत्री तेजस्वी यादव असतील, संजय निरुपम यांना विश्वास

(BIHAR ASSEMBLY ELECTION 2020: third phase voting start, PM Narendra Modi’s appeal to set a new voting record)

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.