Bihar Election Result : बिहारमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी, सर्वात आधी ‘या’ जागेवरचा निकाल येणार

देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अगदी काही तास बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतमोजणीची जोरदार तयारी सुरु आहे.

Bihar Election Result : बिहारमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी, सर्वात आधी 'या' जागेवरचा निकाल येणार
vote

पाटणा : देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अगदी काही तास बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतमोजणीची जोरदार तयारी सुरु आहे. काही तासातच बिहारमध्ये कुणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होणार आहे. जनतेने कुणाला स्विकारलं आणि कुणाला नाकारलं यावरच एक्झिट पोलचे कल बरोबर आहेत की चुकीचे हेही उघड होणार आहे. मतमोजणीसाठी स्ट्राँग रुमपासून मतमोजणी केंद्रांपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय. मतमोजणी केंद्राच्या आजूबाजूला फटाके फोडण्यास आणि रंग-गुलाल उधळण्यास निर्बंध घालण्यात आलेत (Bihar Assembly Election result how counting will be done at counting center).

अंतिम निकालासोबतच अनेकांना बिहारमधील या निवडणुकीची मतमोजणी नेमकी कशा पद्धतीने होणार आणि कोणत्या मतदारसंघाचा निकाल सर्वात आधी लागणार याविषयी देखील उत्सुकता असेल. याशिवाय मतमोजणी व्यवस्थित होण्यासाठी नेमकी काय यंत्रणा तयार करण्यात आली आहे आणि त्यात किती लोक आहेत असाही प्रश्न काहींना पडत आहे.

पाटणा जिल्ह्याच्या 14 विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रिया पाटणातील ए. एन. कॉलेजमधील केंद्रावर होणर आहे. मतमोजणीत सर्वात आधी फतुहा आणि बख्तियारपूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर होईल. कारण या दोन्ही मतदारसंघातील एकूण मतांची तुलना इतर मतदारसंघांच्या तुलनेत खूप कमी आहे. फतुहामध्ये केवळ 405 बूथ, तर बखत्यारपूरमध्ये 416 बूथ आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी दो कक्षांची व्यवस्था करण्यात आली. कोविडच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी 14 टेबलची व्यवस्था करण्यात आलीये. एका हॉलमध्ये 7 आणि दुसऱ्या हॉलमध्ये 7 अशी या टेबलची विभागणी असेल. सर्वात आधी सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेटची मोजणी सुरु होईल. 8 वाजून 15 मिनिटांनी EVM मधील मतांची मोजणी होईल.

14 विधानसभा मतदारसंघाच्या मतांची मोजणीसाठी 600 कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. संपूर्ण मतमोजणी परिसरात सीसीटीव्ही आणि टेलीव्हिजन स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रांच्या सुरक्षेसाठी दो बटालियन पॅरा मिलिट्री फोर्स आणि 200 बिहार पोलीस जवान मॅजिस्ट्रेट यांच्या देखरेखीखाली तैनात करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमार यांना झटका, 63 टक्कांकडून सत्ता बदलाला पसंती

Bihar Exit Poll 2020 : ‘या त्रिसूत्रीने बिहार निवडणुकीचे गणित बदलले?, नितीशकुमारांचं भावनिक कार्डही चाललं नाही?; एक्झिटपोलचा अंदाज

Bihar Election Exit Poll : तेजस्वी तळपले, मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती

संबंधित व्हिडीओ :

Bihar Assembly Election result how counting will be done at counting center

Published On - 6:23 pm, Mon, 9 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI