AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणातील चाणाक्यांना मोठा झटका; पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने तगडा उमेदवार उतरवला

Bankipur by election : बिहारच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट निर्माण झालाय. आरजेडीने प्रशांत किशोर यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिलाय.

राजकारणातील चाणाक्यांना मोठा झटका; पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने तगडा उमेदवार उतरवला
| Updated on: Jul 07, 2026 | 9:00 AM
Share

बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला नवं वळण मिळालं आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने सोमवारी रेखा गुप्ता यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलातून रिंगणात नेमकं कोण उतरणार, हे स्पष्ट झालं आहे. एकीकडे राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते हे जनसुराज पक्षाचे प्रमुख, राजकारणातील चाणाक्य मानले जाणारे प्रशांत किशोर यांना पाठिंबा जाहीर करण्याची चर्चा होती. परंतु राष्ट्रीय जनता दलाने उमेदवार जाहीर केल्याने सर्व चर्चांना ब्रेक लागला आहे.

माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंगनी लाल मंडले यांनी म्हटलं की, रेखा गुप्ता यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हा महागठबंधनने घेतला आहे. रेखा गुप्ता यांनी मागील वर्षी याच मतदारसंघातून आरजेडीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मंगनी लाल मंडल यांनी म्हटलं की, रेखा कुमारी उर्फ रेखा गुप्ता यांनी 2025 साली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना जवळपास 47 मते मिळाली होती. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने बांकीपूरची जागा रिक्त झाली आहे. त्या जागेवर आरजेडीने रेखा गुप्ता यांना पुन्हा उमेदवारी दिली.

आरजेडीच्या मंडल यांनी पुढे म्हटलं की, आम्हाला कॉग्रेसन नेतृत्वाने प्रशांत किशोर समर्थन करण्याविषयी कोणतंही भाष्य केलं नाही. आमच्या उमेदवाराला मित्रपक्षाचा पाठिंबा आहे. आम्ही कोणाच्याही जागेवर दावा केलेला नाही. मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवार रिंगणात उभा होता. त्यानंतर आम्ही यंदाही त्यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीवेळी बांकीपूर विधानसभा मतदारसंघात आरजेडीने निवडणूक लढली होती, त्यामुळे यंदाही आम्ही निवडणुकीच्या मैदानात आहेत’.

भाजपकडून अद्याप उमेदवार जाहीर नाही

भाजपन आतापर्यंत बांकीपूर पोटनिवडणुकीत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. आतापर्यंत जनसुराज पक्षाकडून प्रशांत किशोर, आरजेडी पक्षाकडून रेखा गुप्ता यांना उमेदवारी मिळाली आहे. तर लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांच्या जनसशक्ती जनता दल नावाने सुरू केलेल्या पक्षाने वीणा मानवी यांना उमेदवारी दिली आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे