
बिहार.. एक असं राज्य, ज्याने गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांची धडधड वाढवली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी रेकॉर्डब्रेक मतदान केलं. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी 9 टक्के जास्त होती. त्यानंतर एनडीएच्या बाजूने निकाल लागला. बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांचं राज्य असेल. एनडीएला जरी या निवडणुकीत बहुमत मिळालं असलं तरी निवडणूक कोण जिंकेल याची पर्वा न करता नितीश कुमार नेहमीच त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा करतात. म्हणूनच बिहारमध्ये नितीश कुमार यांनी सर्वाधिक काळ राज्य केलं आहे. बिहारच्या इतिहासात सर्वांत जास्त काळ मुख्यमंत्री असूनही नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणूक का लढवली नाही, याविषयी सविस्तररित्या समजून घेऊयात.. नितीश कुमार यांनी शेवटची विधानसभा निवडणूक कधी लढवली? नितीश कुमार यांनी 1985 मध्ये शेवटची विधानसभा निवडणूक लढवली होती. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. त्यांनी 1977, 1980 आणि 1985 मध्ये सलग...