AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Political Crisis : लालू बिन बिहार नाही चालणार..! भाजपचं सरकार पडल्यानंतर लालुंच्या मुलीने शेअर केलं गाणं

श्रावण महिन्यात माफिवीरांच्या गटाचा नाश होईल म्हणत त्यांनी भाजपवर निशाणाही साधला आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी लालूंना किंगमेकर संबोधले आहे.

Bihar Political Crisis : लालू बिन बिहार नाही चालणार..! भाजपचं सरकार पडल्यानंतर लालुंच्या मुलीने शेअर केलं गाणं
लालू बिन बिहार नाही, चालणार..! भाजपचं सरकार पडल्यानंतर लालुंच्या मुलीने शेअर केलं गाणंImage Credit source: twitter
| Updated on: Aug 09, 2022 | 5:07 PM
Share

पाटणा : बिहारमध्ये सध्या मोठं सत्तांतर होतंय. जेडीयू (JDU) आणि भाजपची (BJP) युती तुटली आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत नवी आघाडी तयार झाली आहे. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी एक भोजपुरी गाणं शेअर करताना लिहिले आहे की, “राजतिलक की करो तैयार आर रहे हैं लालटेन धारी”. या गाण्यात लालू यादव यांच्यासोबत तेजस्वी यादवही दिसत आहेत. लालू बिना चलू बिहार ना होई, असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे खेसारी लाल यादव यांनी गायले असून कृष्णा बेदर्दी यांनी लिहिले आहे. सध्या रोहिणी एकापाठोपाठ एक ट्विट करत आहेत. भोले बाबांच्या कृपेने चमत्कार घडतील, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. श्रावण महिन्यात माफिवीरांच्या गटाचा नाश होईल म्हणत त्यांनी भाजपवर निशाणाही साधला आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी लालूंना किंगमेकर संबोधले आणि लिहिले की त्यांचा आकाशाच्या उंचीपेक्षा जास्त विश्वास आहे, लोकांचा अभिमान आहे.

रोहिणी यांचं पहिलं ट्विट

रोहिणी यांचं दुसरं ट्विट

तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया

नव्या सरकारबाबत बोलताना तजस्वी यादव म्हणाले, बिहारच्या नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाच्या वाटपाबाबत मतभेद होणार नाहीत. आमचं संख्याबळ 160 आहे. भाजपने अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. आमचे सरकार बेरोजगार तरुणांना प्रथम प्राधान्य देणार आहे. दुसरीकडे, जेडीयूच्या राष्ट्रीय संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी ट्विट करून नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नव्या रूपात नव्या युतीचे नेतृत्व केल्याबद्दल नितीश कुमार यांचे अभिनंदन.

भाजपला मोठा झटका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेडीयूच्या अनेक आमदारांनी एमएलसीच्या बैठकीत नितीश कुमार यांना सांगितले की भाजप 2020 पासून त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. चिराग पासवान यांचे नाव न घेता ते असेच एक उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. आताच सावध झाले नाही तर पक्षाचं वाटोळं होईल, अशी भितीही त्यांना होती.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.