AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Assembly Election Results 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत Gen Z चं कोण आघाडीवर, कोणाला बसला फटका ?

Bihar election 2025 Gen Z candidates Result : बिहार विधानसभा निवडणूक 2025मध्ये Gen Z चे बरेच उमेदवार मैदानात आहे. आरजेडी, भाजप, जेडीयू, काँग्रेस आणि इतर पक्षांनी 25 ते 30 वयोगटातील ्नेका तरुणांना मैदानात उतरवलं असल्याने निवडणूकीत एकदम जोश आहे. त्यापैकी कोणा आघाडीवर , कोणी कोणाला पिछाडीवर टाकलं ते जाणून घेऊया.

Bihar Assembly Election Results 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत Gen Z चं कोण आघाडीवर, कोणाला बसला फटका ?
बिहार निवडणूक 2025Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Nov 14, 2025 | 12:21 PM
Share

बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये यंदा Gen Z चे उमेदवार सर्वात जास्त चर्चेत आहेत. 25 ते 30 वयोगटातील तरुण यंदा मोठ्या संख्येने पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी तरुण उमेदवार प्रभावी चेहरा असू शकतात याची जाणीव राजकीय पक्षांना होती, म्हणूनच बिहारच्या निवडणुकीत यंदा प्रत्येक प्रमुख पक्षाने त्यांच्या तिकिटावर तरुण उमेदवार उभे केले. सध्या भाजपच्या तरुण उमेदवार मैथिली ठाकूर अलीनगरमध्ये आघाडीवर आहेत.

भाजपची य़ुवा ब्रिगेड

या निवडणुकीत भाजपनेही Gen Z ला पुढे आणलं आहे. 25 वर्षांची गायिका, मैथिली ठाकूर ही पहिल्यांदाच दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. तर 30 वर्षांचे राकेश रंजन यांना भोजपूर जिल्ह्यातील शाहपूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

जेडीयूचे तरूण उमेदवार

जेडीयूचेनेदेखील अनेक तरूण उमेदवारांना संधि दिली आहे. 27 वर्षीय रवीना कुशवाह समस्तीपूरमधील विभूतीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. तर 30 वर्षीय आदित्य कुमार यांना मुझफ्फरपूरमधील सकरा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच 30 वर्षांची कोमल कुशवाहा देखील गायघाट मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

एलजेपी (रामविलास) आणि CPI-ML नेही दिली तरूणांना संधी

लोजपा (रामविलास) ने पाटण्यातील फतुहा मतदारसंघातून 29 वर्षीय रूपा कुमारी यांना उमेदवारी दिली आहे तर सीपीआय (एमएल-एल) ने गोपाळगंज जिल्ह्यातील भोरे मतदारसंघातून 29 वर्षीय धनंजय कुमार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.

आरजेडी चे Gen Z उमेदवार

यावेळी राजदने देखील अनेक तरुण उमेदवारांवर विश्वास ठेवला आहे. 26 वर्षीय तनुश्री कुमारी यांना बाराचट्टी येथून तिकीट देण्यात आले आहे. मुन्ना शुक्ला यांची 28 वर्षांची मुलगी, शिवानी ही वैशाली जिल्ह्यातील लालगंज मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. तसेच 28 वर्षीय दीपू सिंग हे भोजपूर जिल्ह्यातील संदेश मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत, आणि रविरंजन या 29 वर्षांच्या उमेदवाराला नालंदाच्या अस्थान मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे.

काँग्रेसमधून कोण ?

काँग्रेस पक्षाने देखील Gen Z वर विश्वास ठेवत 25 वर्षांच्या नवीन कुमार यांना उमेदवारी दिली आहे, त्यांनी युवा नेतृत्वाला प्रोत्साहन दिले आहे. 2025 च्या निवडणुकीत ते काँग्रेस पक्षातील सर्वात तरुण चेहऱ्यांपैकी एक म्हणून उदयास आले आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.