
Sunil Kumar Pintu Viral Video : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने जोरदार मुसंडी मारली. या निवडणुकीत जेडीयू, काँग्रेसप्रणित महागठबंधनचा धक्कादायक आणि दारुण पराभव झाला आहे. दरम्यान, भाजपाने या निवडणुकीत दमदार कामगिरी करून दाखवली आहे. या निवडणुकीत भाजपाच्या अनेक उमेदवारांनी आश्चर्यकारक पद्धतीने विजय मिळवला आहे. आता बाजपाच्या याच विजयी उमेदवारांमध्ये सुनील कुमार पिंटू यांची देशभरात चर्चा होत आहे. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी त्यांचा एक कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर बिहारच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. एका महिलेसोबत कथित अश्लील व्हिडीओ समोर आल्यानंतरही सुनील कुमार पिंटू हे विजयी झाले आहेत.
भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या सुनील कुमार पिंटू यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी सीतामढी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा या निवडणुकीत विजय झालेला असला तरी मतदानाच्या काही दिवस अगोदर त्यांचा कथित अश्लील व्हिडीओ समोर आला होता. परंतु तरीदेखील त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. याआधी त्यांनी नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या तिकिटावर 17 व्या लोकसभेसाठी खासदारकी भूषवलेली आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीआधी सुनील कुमार पिंटू यांचा कथित अश्लील व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा आणि मॉर्फ केलेला आहे, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते.
सुनील कुमार पिंटू यांनी आपल्या तक्रारीत सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा असल्याचा दावा केला होता. सोबतच माझी प्रतीमा तसेच राजकीय प्रतिष्ठेला धुळीस मिळवण्यासाठी विरोधकांचा हा कट आहे, असाही आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला होता. 2023 सालीदेकील त्यांचे असेच काहीसे कथित व्हिडीओ व्हायरल झाले होते. बिहारच्या विधानसभा निवडणुकीआधी समोर आलेल्या कथित अश्लील व्हिडीओत सुनील कुमार पिंटू एका महिलेसोबत अश्लील कृत्य करताना दिसत होते. सोबतच आणखी एका व्हिडीओ कॉलमध्ये ते अश्लील हावभाव करताना दिसत होते.
दरम्यान, हे कथित व्हिडीओ समोर येऊनही सीतामढी विधानसभेच्या जागेवर सुनील कुमार पिंटू यांनी विजय मिळवला आहे. त्यांना एकूण 1,04,226 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या आरजेडीच्या सुनील कुार कुशवाह यांना 98,243 मते मिळाली. 2010 सालच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला होता. 2015 सालच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना आरजेडीच्या उमेदवाराने पराभूत केले होते.