AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात येणार भाजप युतीचं सरकार, कोणतं आहे ते राज्य?

BJP-JDU government : महाराष्ट्रात महाविकासआघाडीतून शिवसेना बाहेर पडल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार देखील महायुतीत सरभागी झाले आहेत. आता आणखी एका राज्यात अशीच परिस्थिती आहे. येथे देखील भाजप युतीचं सरकार येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात येणार भाजप युतीचं सरकार, कोणतं आहे ते राज्य?
| Updated on: Jan 26, 2024 | 5:07 PM
Share

JDU-BJP : बिहारमधील राजकीय हालचालींवर आरजेडी लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी एका राज्यात भाजप युतीचं सरकार येण्याची शक्यता आहे. आरजेडीचे खासदार मनोज झा म्हणाले की, मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राजकीय गोंधळ संपवण्याची विनंती करतो. राजदने असे कधीच केले नाही. सायंकाळपर्यंत संभ्रम दूर होईल, अशी आशा आहे. नितीशकुमार एनडीएमध्ये गेल्यास इंडिया आघाडीला मोठा धक्का बसू शकतो. कारण आधीच दोन पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केले आहे.

नितीन कुमार यांनी भाजपसोबत आधी सत्ता स्थापन केली होती. पण नंतर त्यांनी आरजेडी सोबत हात मिळवणी करत सत्ता स्थापन केली. आता पुन्हा एकदा ते भाजपसोबत सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय कुमार सिन्हा यांनी शुक्रवारी सांगितले की, आमचे केंद्रीय नेतृत्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. नेतृत्व गांभीर्याने विचार करूनच कोणताही निर्णय घेईल.

चिराग पासवान काय म्हणाले

लोजपचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीतही बिहारमध्ये एनडीए इतका मजबूत आहे की आम्ही 40 पैकी 40 जागा जिंकू शकतो. मला माहित नाही की नितीश कुमार एनडीएचा भाग बनतील की इंडिया आघाडीत राहतील. परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट झाल्यावरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.

मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.