काँग्रेसच्या मतदारांनी अन्नत्याग करावा, पेट्रोल वापरणं बंद करावं; महागाई कमी होईल,भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेसच्या मतदारांनी अन्नत्याग करावा, पेट्रोल वापरणं बंद करावं; महागाई कमी होईल,भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
ब्रीजमोहन अग्रवाल

काँग्रेसला मतदान करणारे आणि काँग्रेसी व्यक्तींनी अन्न त्याग करावं, पेट्रोलचा वापर बंद करावा, असं वक्तव्य भाजप नेत्यानं केलं आहे. BJP Brijmohan Agrawal congress

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jun 04, 2021 | 11:44 AM

रायपूर: पेट्रोलच्या दरानं शंभरी केव्हाच ओलांडली असून डिझेल देखील नवद्द रुपयांच्यावर गेलं आहे. खाद्यतेलांच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत. महागाई आणि कोरोनाचं संकट वाढलं असताना राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. छत्तीसगडमध्ये तीन वेळा मंत्रिपद भूषवलेल्या वरिष्ठ भाजप नेत्यानं एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ब्रीजमोहन अग्रवाल या भाजप नेत्यानं ” जर काँग्रेसला मतदान करणाऱ्या लोकांनी आणि काँग्रेसी व्यक्तींनी खाणे पिणे सोडले तर महागाई कमी होईल”असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. (BJP leader Brijmohan Agrawal said congress party members and voters leave food for decrease of inflation)

काँग्रेस आक्रमक

छत्तीसगडमधील भाजप सरकारच्या काळाता तीन वेळा कॅबिनेट मंत्री राहिलेले भाजप आमदार ब्रीजमोहन अग्रवाल यांनी महागाईवरुन काँग्रेसवर निशाणा साधला. ” जर काँग्रेसला मतदान करणाऱ्या लोकांनी आणि काँग्रेसी व्यक्तींनी खाणे पिणे सोडले तर महागाई कमी होईल” असं ते म्हणाले. अग्रवाल यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी अग्रवाल यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.

महागाई राष्ट्रीय आपत्ती:काँग्रेस

काँग्रेस अध्यक्ष मोहन मरकाम यांनी महागाईच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला. मोहन मरकाम यांनी महागाई ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचं म्हटलं. गेल्या 7 वर्षात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महागाईमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं लोकांचं उत्पन्न घटलं आहे. कोरोना लॉकडाऊनमुळं लोकांसमोरील अडचणी वाढल्या असताना महागाई देखील वाढली आहे. भारतातील वाढत्या महागाईला मोहन मरकाम यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची धोरण जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

भाजपकडून पलटवार

कांग्रेस प्रदेश अध्यक्ष मोहन मरकाम यांनी महागाईला नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. ब्रीजमोहन अग्रवाल यांनी वेळी महागाई जर राष्ट्रीय आपत्ती असेल असं ज्या लोकांना वाटत असेल त्यांनी खाणे पिणे सोडलं पाहिजे, असं वक्तव्य केलं. काँग्रेसला मतदान करणारे आणि काँग्रेसी व्यक्तींनी अन्न त्याग करावं, पेट्रोलचा वापर बंद करावा. काँग्रेसी आणि काँग्रेसच्या मतदारांनी असं केल्यास महागाई काही प्रमाणात कमी होईल, असं अग्रवाल म्हणाले.त्यांच्याया वक्तव्यानंतर छत्तीसगडचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

हेही वाचा:

ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री; अनलॉकच्या गोंधळावरून फडणवीसांचा टोला

त्या प्रीवेडिंगवाल्यांना कशाला अडवताय, ते हनिमूनालाही इथेच आले पाहिजेत, अजितदादांचा प्रेमळ दम

(BJP leader Brijmohan Agrawal said congress party members and voters leave food for decrease of inflation)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें