त्या प्रीवेडिंगवाल्यांना कशाला अडवताय, ते हनिमूनालाही इथेच आले पाहिजेत, अजितदादांचा प्रेमळ दम

त्या प्रीवेडिंगवाल्यांना कशाला अडवताय, ते हनिमूनालाही इथेच आले पाहिजेत, अजितदादांचा प्रेमळ दम
अजित पवार

अजित पवार यांनी श्रीवर्धन बीच सुशोभिकरण प्रकल्पाचे भूमिपूजन केले. (Ajit Pawar Srivardhan Beach Inauguration)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 04, 2021 | 11:21 AM

गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, रायगड : श्रीवर्धनच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. श्रीवर्धन बीच सुशोभिकरणाचा नारळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवला. प्रीवेडींग शूट करण्यासाठी श्रीवर्धनला येणाऱ्या जोडप्यांची प्रकरणं पोलीस ठाण्यात जातात, मात्र त्यांना चांगली वागणूक द्या, जेणेकरुन त्यांनी हनिमूनलाही इथेच आलं पाहिजे, असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. (Ajit Pawar Srivardhan Beach Inauguration talks on Prewedding Photo Shoot Couples being harassed)

अजित पवार यांनी श्रीवर्धन बीच सुशोभिकरण प्रकल्पाचे भूमिपूजन केले. यावेळी अजितदादांनी बीचची पाहणी केली. तसेच तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. बीच सुशेभिकरण, लॅंडस्केपिंग, झाडांची लागवड, वादळात हॉटेल कसे टिकतील, या सगळ्यांची इंजिनिअरकडून माहिती घेतली. यावेळी श्रीवर्धन लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare), त्यांच्या कन्या आमदार अदिती तटकरे उपस्थित होत्या. बीचच्या वाळूबद्दल माहिती घेत तिचा रंग काळा पडल्याबद्दल अजित पवारांनी चिंता व्यक्त केली.

अजित पवार काय काय म्हणाले?

दरम्यान, प्रीवेडिंग शूटसाठी इकडे कपल येतात, पण त्यांना श्रीवर्धनमध्ये स्थानिक लोक अडवतात, फोटो काढू देत नाहीत, वादावादी होते, प्रकरणं पोलीस स्टेशनपर्यंत जातात. पण असं करु नका, अडवू नका. त्यांना फोटो काढू द्या, इथलं पर्यटन इतकं वाढवा की लग्नानंतर जोडपी हनिमूनलाही इकडेच आली पाहिजेत. अॅनिव्हर्सरी असो, बर्थ डे असो सगळे कार्यक्रम इकडेच झाले पाहिजेत, असं इथलं पर्यटन वाढवा, असं अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले. त्यावर, श्रीवर्धनचं गतवैभव पुन्हा अधोरेखित करु. निसर्गाने नटलेल्या परिसराचा विकास करु, कोकणाला अजितदादांकडून भरभरुन मिळेल, असं सुनिल तटकरे म्हणाले.

पाच वर्षात चार वादळं आली. सरकार पाठिशी आहे, केंद्र सरकारचे नियम लहान असतील तरी साडेतीन पट पैसे देण्याचं काम राज्याने केलं. कोरोना कसा अटॅक करेल सांगता येत नाही. नियम ठरवून दिल्याप्रमाणे पालन करण्याचं आपलं काम आहे. आततायीपणा जीवावर बेततोय. कुणालाही वाटलं नव्हतं की महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना होईल, कामाला सुरुवात करताच कोरोनाने प्रवेश केला, असं अजित पवार म्हणाले.

“रायगडची ऐतिहासिक भूमी”

14 महिने झाले. राज्याच्या तिजोरीत श्रीवर्धनकडून 1 लाख येत होते, पण ते आता येत नाहीत. पवारांनी अनेक हल्ले, वादळं, दुष्काळ, गारपीट पाहिली, पण त्यातून न डगमगता राज्याला, जनतेला उभं करण्याचं काम केलं. ही भूमी ऐतिहासिक आहे. छत्रपतींचा वारसा आहे, महाडचं चवदार तळंही इथेच. सीडी देशमुख, कान्होजी आंग्रेंचा इतिहास आहे. त्यामुळे इथे आल्याचा आनंद असल्याचं अजित पवार म्हणाले.

“कोकणाबद्दल पवारांनाही प्रेम”

रायगडावर सुवर्णतुला चार जूनला झाली, त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. कोकणाबद्दल पवारांनाही प्रेम आहे. या परिसराचा कॅलिफोर्निया करावा, अशी त्यांची इच्छा आहे. राज्य सरकारने निधी देण्याचं काम केलं. मुंबई गोवा इथे फॉरेस्टची अडचण आहे. काम रखडलंय, आम्ही नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करतोय, लवकरच काम होईल अशी अपेक्षा आहे.

हेरीटेज ट्री संकल्पना

बाप-दादांनी लावलेली झाडं कोलमडून पडली तर पावसाळ्यात चौपट झाडं लावा. शंभर वर्षांपूर्वीच्या झाडांसाठी हेरीटेज ट्री ही संकल्पना आहे. ही झाडं तोडता येणार नाहीत, त्याला कायद्याचं संरक्षण असेल. वाऱ्याच्या वेगाला टिकणाऱ्या झाडांची वानवा आहे. लॅंडस्केपिंग करताना झाडांचा विचार व्हायला हवा, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या   

सत्तांतरानंतर ‘गोकुळ’ला अच्छे दिन, अजित पवार यांची मोठी घोषणा

(Ajit Pawar Srivardhan Beach Inauguration talks on Prewedding Photo Shoot Couples being harassed)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें