सत्तांतरानंतर ‘गोकुळ’ला अच्छे दिन, अजित पवार यांची मोठी घोषणा

भूषण पाटील

| Edited By: |

Updated on: Jun 04, 2021 | 8:11 AM

मार्केटिंग आणि दूध विक्रीसाठी नवी मुंबईत वाशीमध्ये जागा निश्चित करण्याचे आदेश अजित पवार यांनी सिडकोला दिले आहेत (Gokul Dudh Sangh Ajit Pawar )

सत्तांतरानंतर 'गोकुळ'ला अच्छे दिन, अजित पवार यांची मोठी घोषणा
गोकुळच्या संचालक मंडळाची अजित पवारांशी भेट
Follow us

कोल्हापूर : कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाला (Kolhapur Gokul Dudh Sangh Election) आता नवी मुंबईत जागा मिळणार आहे. मार्केटिंग आणि दूध विक्रीसाठी सिडकोची पाच एकर जागा गोकुळ दूध संघाला देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. सत्तांतरानंतर गोकुळ दूध संघाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने अजित पवारांची भेट घेतली, त्यावेळी यासंदर्भात घोषणा करण्यात आली. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार आहोत, असे सूतोवाच काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी विजयानंतर दिले होते. (Kolhapur Gokul Dudh Sangh to get Land in Navi Mumbai Ajit Pawar announces after meeting Directors)

अजित पवारांचे आदेश काय?

मार्केटिंग आणि दूध विक्रीसाठी नवी मुंबईत वाशीमध्ये जागा निश्चित करण्याचे आदेश अजित पवार यांनी सिडकोला दिले आहेत. त्यानुसार सिडकोची पाच एकर जागा गोकुळ दूध संघाला मिळणार आहे. सत्तांतरानंतर गोकुळ संचालक मंडळाने घेतलेल्या भेटीवेळी अजित पवार यांनी जागेसंदर्भात घोषणा केली. नव्या जागेमुळे मुंबईतही गोकुळचे प्रस्थ वाढणार आहे. संचालक मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे दिग्गज नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचीही यावळी भेट घेतली.

गोकुळ निवडणूक

गेल्या महिन्यात झालेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत अखेर सत्तांतर झालं. गोकुळ दूध संघावर सतेज पाटील-हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने विजय मिळवला. गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक (Mahadevrao Mahadik) आणि आमदार पी एन पाटील गटाच्या तब्बल तीन दशकांच्या सत्तेला सतेज पाटील गटाने शेवटी सुरुंग लावला. गोकुळ दूध संघाच्या 21 पैकी 17 जागा या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या आघाडीला मिळाल्या. सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं.

दूध उत्पादकांना दोन रुपयांची दरवाढ 

गोळुळ दूध संघाची निवडणूक जिकंल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी “दूध उत्पादकांनी चांगलं यश दिलं. मनापासून डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार मानतो. हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोण्याच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपलीये, काल कोणी काय केलं यावरून आम्ही निवडणूक आलोय. आता आमचा नवा अजेंडा असणार आहे. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार आहोत. शेतकऱ्यांना 2 रुपये दर वाढवून देणार आहोत. आमच्या शब्दात आम्ही कोठेही मागे पडणार नाही. दूध गोकूळ संघात प्रस्थापित व्यवस्था आहे. त्यातल्या उणिवा दूर करायच्या आहेत. आम्हाला थोडा वेळ द्या,” असे निवडणूक जिंकल्यानंतर सतेज पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या   

राजेश टोपेंनी उल्लेख केलेला गडहिंग्लजमधील ऑक्सिजन प्लांट नेमका कसा आहे?

‘गोकुळ’ जिंकताच सतेज ऊर्फ बंटी पाटलांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ

डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार, आता मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार – सतेज पाटील

(Kolhapur Gokul Dudh Sangh to get Land in Navi Mumbai Ajit Pawar announces after meeting Directors)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI