गोकुळचा धमाका सुरु, आता ऑक्सिजन प्लान्ट उभारणार, सत्ता येताच सतेज पाटलांची घोषणा

गोकुळ दूध संघ ऑक्सिजन प्लान्ट (Gokul Oxygen plant) उभारणार आहे. सत्ता येताच सतेज पाटील यांनी ही मोठी घोषणा केली.

गोकुळचा धमाका सुरु, आता ऑक्सिजन प्लान्ट उभारणार, सत्ता येताच सतेज पाटलांची घोषणा
कोल्हापूर गोकुळ दूधसंघ
सचिन पाटील

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 14, 2021 | 1:01 PM

कोल्हापूर : गृहराज्य मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी गोकुळ दूधसंघाची निवडणूक (Kolhapur Gokul Dudh Sangh Election) जिंकताच आणखी एक मोठी घोषणा केली आहे. गोकुळ दूध संघ ऑक्सिजन प्लान्ट (Gokul Oxygen plant) उभारणार आहे. सत्ता येताच सतेज पाटील यांनी ही मोठी घोषणा केली. (Gokul Dudh Sangh to set up oxygen plant in Kolhapur said Maharashtra state minister Satej Patil after gokul election result)

गोकुळ दूध संघावर सतेज पाटील-हसन मुश्रीफ (Hasan Mushri) यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने विजय मिळवला. गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक (Mahadevrao Mahadik) गटाच्या तब्बल तीन दशाकाच्या सत्तेला सतेज पाटील गटाने शेवटी सुरुंग लावला. येथे एकूण 21 जागांपैकी तब्बल 17 जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर महाडिक गटाला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले.

दरम्यान, आज नूतन संचालकांसोबत नेते मंडळींची बैठक होत आहे. सतेज पाटील-हसन मुश्रीफ यांनी सत्ता येताच शेतकऱ्यांना दुधाला लिटरमागे 2 रुपये दरवाढ देण्याची घोषणा केली होती. त्याबाबत सतेज पाटील म्हणाले, “दोन रुपये दूध दरवाढ देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. दोन महिन्यांच्या अवधीत दिलेली आश्वासने पूर्ण करणार. किमान दोन संचालक दररोज गोकुळच्या मुख्य कार्यालयात दूध उत्पादकांना भेटतील”

गडहिंग्लजमधील ऑक्सिजन प्लांट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील ऑक्सिजन प्लांटचा उल्लेख केला होता. राज्य सरकार कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये (Gadhinglaj oxygen plant) उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचं मॉडेल राज्यभर राबवण्याच्या तयारीत आहे.

गडहिंग्लजमधल्या उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारण्यात आला आहे. जानेवारीमध्ये हा प्लांट कार्यान्वित झाला आहे. 80 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्लांटमध्ये दररोज 150 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भरू शकेल अशी क्षमता आहे. त्यामुळे या प्लांटमधील ऑक्सिजन सुमारे 100 रुग्णांना उपयोगी ठरू शकतो. हा ऑक्सिजन प्लांट राज्यासाठी रोल मॉडेल ठरला असून, असे प्लांट राज्यभरातील उपजिल्हा रुग्णलयात उभारण्याचं नियोजन राज्य सरकार करत आहे.

गोकुळ निवडणूक

 गोकुळमध्ये अखेर सत्तांतर झालं. गोकुळ दूध संघाच्या 21 पैकी 17 जागा या सतेज पाटील यांच्या आघाडीला मिळाल्या. सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानव लागलं. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता संपुष्टात आली.

दूध उत्पादकांना दोन रुपयांची दरवाढ 

गोळुळ दूध संघाची निवडणूक जिकंल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी “दूध उत्पादकांनी चांगलं यश दिलं. मनापासून डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार मानतो. हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोण्याच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपलीये, काल कोणी काय केलं यावरून आम्ही निवडणूक आलोय. आता आमचा नवा अजेंडा असणार आहे. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार आहोत. शेतकऱ्यांना 2 रुपये दर वाढवून देणार आहोत. आमच्या शब्दात आम्ही कोठेही मागे पडणार नाही. दूध गोकूळ संघात प्रस्थापित व्यवस्था आहे. त्यातल्या उणिवा दूर करायच्या आहेत. आम्हाला थोडा वेळ द्या,” असे निवडणूक जिंकल्यानंतर सतेज पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या   

राजेश टोपेंनी उल्लेख केलेला गडहिंग्लजमधील ऑक्सिजन प्लांट नेमका कसा आहे?

‘गोकुळ’ जिंकताच सतेज ऊर्फ बंटी पाटलांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ

Gokul Dudh Sangh Election Final Result | डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार, आता मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार – सतेज पाटील

(Gokul Dudh Sangh to set up oxygen plant in Kolhapur said Maharashtra state minister Satej Patil after gokul election result)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें