असे क्षण महत्त्वाचे असतात; नितेश राणे-निलेश राणे दिल्लीत दाखल

भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. राणे यांची पत्नी निलम राणे, चिरंजीव नितेश राणे आणि निलेश राणेही दिल्लीत दाखल झाले आहेत. (Modi cabinet expansion)

असे क्षण महत्त्वाचे असतात; नितेश राणे-निलेश राणे दिल्लीत दाखल
nitesh rane
| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 1:11 PM

नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. राणे यांची पत्नी निलम राणे, चिरंजीव नितेश राणे आणि निलेश राणेही दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे राणे यांचं मंत्रिपद फिक्स असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आमदार नितेश राणे यांनी असे क्षण महत्त्वाचे असतात, असे सांगून सूचक संकेत दिल्याने या चर्चांना उधाण आलं आहे. (bjp leader nitesh rane reaction on modi cabinet expansion)

नारायण राणे कालच दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोन आल्यानंतर ते सिंधुदुर्गातून गोवा आणि पुढे दिल्लीत दाखल झाले. आज सकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. काल संध्याकाळी दिल्लीतील भाजप नेत्यांच्या गाठीभेटीही त्यांनी घेतल्या. त्यात त्यांचं मंत्रिपद फिक्स झाल्याने राणे यांचे कुटुंबीय दिल्लीत दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे. आज सायंकाळी शपथविधी सोहळा होणार असल्याने कुटुंबीय सोबत असल्याने राणेंनी कुटुंबाला दिल्लीत बोलावून घेतल्याचं सांगितलं जात आहे.

फक्त दोनच जणांना प्रवेश

शपथविधी सोहळ्याप्रसंगी प्रत्येक नेत्यांच्या केवळ दोनच नातेवाईक किंवा कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र, राणेंच्या कुटुंबातील तिन्ही सदस्य शपथविधी सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नितेश राणे काय म्हणाले?

नितेश राणे आज दिल्लीत आले असता त्यांना आमच्या प्रतिनिधीने गाठले. नितेश यांच्यावर अनेक प्रश्नांचा भडिमार केला. मात्र नितेश अत्यंत सावध प्रतिक्रिया देत होते. परंतु, बोलता बोलता त्यांनी राणेंना मंत्रिपद मिळण्याचे संकेत दिल्याने राणेंची मोदी मंत्रिमंडळातील वर्णी फिक्स झाली असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. नारायण राणे केंद्रात मंत्री होणार आहेत. असे क्षण आयुष्यात किती महत्त्वाचे असतात, असा सवाल नितेश राणे यांना केला. त्यावर असे क्षण महत्त्वाचे असतात, असं त्यांनी सांगून राणेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे संकेत दिले. त्यानंतर मात्र, नन्नाचा पाढा वाचत त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. थोडा संयम ठेवा. राणेसाहेब पंतप्रधानांकडे आहेत. तेच सर्व काही सांगतील, असं ते म्हणाले.

मिळेल ती जबाबदारी घेऊ

मिळणारं कोणतंही मंत्रिपद कोणत्याही इतर कारणासाठी वापरलं जात नाही. जनतेसाठी मंत्रिपद वापरलं जातं. राणेंनी त्यांचं मंत्रिपद नेहमीच जनतेसाठी वापरलं आहे, असं सांगतानाच पक्ष वाढवणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडण्यास आम्ही तयार आहोत, असं ते म्हणाले. राणेंची क्षमता पक्षनेतृत्वाला माहीत आहे. त्यामुळे ते योग्य तोच निर्णय घेतील, असं सूचक विधानही त्यांनी केलं. (bjp leader nitesh rane reaction on modi cabinet expansion)

 

संबंधित बातम्या:

भारती पवार यांचा मोदी टीममध्ये समावेश होणार?; पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा

राणे, कपिल पाटलांचं मंत्रिपद फिक्स?, मोदींच्या निवासस्थानी दाखल; तर्कवितर्कांना उधाण

आदित्य ठाकरेंवर बोलताना नितेश राणेंचा तोल गेला, शिवसैनिकांचा राडा, नितेश म्हणाले, ‘शब्द मागे घेतो’!

(bjp leader nitesh rane reaction on modi cabinet expansion)