AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारती पवार यांचा मोदी टीममध्ये समावेश होणार?; पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा

: आज संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजप नेते नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि हिना गावित यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (bharti pawar)

भारती पवार यांचा मोदी टीममध्ये समावेश होणार?; पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा
bharti pawar
| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 12:37 PM
Share

नवी दिल्ली: आज संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजप नेते नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि हिना गावित यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता त्यात महाराष्ट्रातून आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. नाशिकच्या खासदार भारती पवार यांचा मोदी टीममध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भारती पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (bharti pawar will get ministry in cabinet expansion)

आज संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारात महाराष्ट्रातून भाजपच्या काही खासदारांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेते नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि हिना गावित यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता खासदार भारती पवार यांचं नावही चर्चेत आलं आहे. भारती पवार या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडे केंद्रीय राज्य मंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे नव्या विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला चार की पाच मंत्रिपदं येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच या नेत्यांच्या बदल्यात कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कापला जाणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

भारती पवार यांनी 5 जुलै 2019मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत देखील लाखांच्या घरात मतदान घेणाऱ्या भारती पवार या माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्ती ए टी पवार यांच्या स्नुषा आहेत. त्यामुळे भारती पवारांच्या निमित्तानं भाजपनं उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक मोठं घराणं गळाला लावल्याचं बोललं जात होतं.

नेमक्या कोण आहेत भारती पवार?

भारती पवार राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष होत्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं काम आहे स्वत: डॉक्टर असल्यानं एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा. भारती पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मोठं जाळं त्यांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आणि कामं 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार असताना, लाखांच्या घरात मतं मिळवली . राष्ट्रवादीनं उमेदवार आयात केल्यानं ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभुती. स्वत:ची यंत्रणा आणि आता सत्ताधारी भाजपची ताकद मिळाल्यानं दिंडोरीत ताकद वाढली. मुंबईत भाजप प्रवेशांनंतर भारती पवार यांनी पक्ष देईल ती जवाबदारी पार पाडू असं सांगितलं. भाजप महिलांचा योग्य सन्मान राखणारा पक्ष असल्याचं सूचक वक्तव्य भारती पवार यांनी केलं. (bharti pawar will get ministry in cabinet expansion)

संबंधित बातम्या:

राणे, कपिल पाटलांचं मंत्रिपद फिक्स?, मोदींच्या निवासस्थानी दाखल; तर्कवितर्कांना उधाण

Cabinet Expansion: मोदींच्या मंत्रीमंडळात OBC मंत्र्यांचा दबदबा राहणार? कुठल्या राज्यातून कोण? महाराष्ट्रातून कुणाला लॉटरी? वाचा एका क्लिकवर

12 निलंबित आमदार पुन्हा एकवटले; देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं सुरू

(bharti pawar will get ministry in cabinet expansion)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.