
West Bengal Assembly Election : सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांत मोठी खडाजंगी होताना पाहायला मिळत आहे. विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांनी खिंडीत काठण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेतेही काँग्रेसला केंद्रस्थानी ठेवून टीकेला प्रत्युत्तर देत आहेत. दरम्यान, 2025 साल सरत आले आहे. लवकरच 2026 सालाला सुरुवात होणार आहे. या नव्या वर्षात मार्च-एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी भाजपाने आतापासूनच चालू केली आहे. त्याचा प्रत्यय संसदेतील चर्चेतून आला आहे. यावेळी संसदेतील चर्चेत वंदे मातरम, बंकिम बाबू, शुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यासारख्या नेत्यांनाचा भाजपाच्या नेत्यांनी अनेकवेळा उल्लेख केला. भाजपाची ही भूमिका म्हणजे पश्चिम बंगाला जिंकण्यासाठीचे डावपेच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच संसदेत नेमकं काय काय घडलं? संसदेत झालेल्या चर्चेतून भाजपाची पश्चिम बंगालच्या निवडणुकीची तयारी कशी दिसून येते? हे जाणून घेऊ या… ...