AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आसाम आणि बंगालमध्ये भाजपाचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

भाजपाला पाचपैकी तीन राज्यात मोठा विजय मिळाला आहे. यावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे.

आसाम आणि बंगालमध्ये भाजपाचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
rahul gandhi file photo
| Updated on: May 04, 2026 | 11:50 PM
Share

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकांत भाजपाचा तीन राज्यात मोठा विजय झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये तर भाजपाने तृणमुळ काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा अभेद्य किल्ला नष्ट केला आहे.आसाम आणि पद्दुचेरी या राज्यातही भाजपाचे सरकार येत आहे. आसाममध्ये भाजपाने तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅटट्रीक साधली आहे. दरम्यान, भाजपाच्या या विजयावर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

भाजपाने पश्चिम बंगाल येथील गेल्या अनेक वर्षांचे ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे सरकार उलथवून लावत बहुमत मिळवले आहे. भाजपाची अनेक वर्षांची या राज्यात शिरकाव करण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. पाच राज्यांपैकी आता प.बंगाल, आसाम आणि पद्दुचेरी या तीन राज्यात भाजपाचे सरकार येणार आहे हे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात आता विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी या राज्यातील भाजपाच्या विजयावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, ‘ आसाम आणि बंगाल ही स्पष्ट उदाहरणे आहेत जेथे निवडणूक आयोगाच्या (EC) मदतीने भाजपाने निवडणूक चोरली आहे. आम्ही ममताजींशी सहमत आहोत. बंगालमध्ये १०० हून अधिक जागा चोरल्या गेल्या आहेत. हीच कार्यपद्धती ( playbook ) आम्ही यापूर्वीही पाहिली गेली आहे: मध्य प्रदेश. हरियाणा. महाराष्ट्र. लोकसभा २०२४ इत्यादी.

अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपाचा विजयाचा समाचार घेतला आहे.

येथे पोस्ट पाहा –

तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील विजय !

या आधी राहुल गांधी यांनी आणखी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये आपण थिरु विजय यांच्या बोललो आहोत आणि टीव्हीकेच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. हा जनादेश तरुणांच्या वाढत्या आवाजाचे प्रतिबिंब आहे, ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही आणि केले जाणारही नाही.

तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. मी पुन्हा एकदा सांगू इच्छीतो की काँग्रेस पक्ष तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील जनतेचे रक्षण आणि सेवा करणे अविरतपणे सुरूच ठेवेल असे या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं