Mithun Chakraborty : तुम्ही फक्त बॉर्डरवर फेंसिंगच्या कामात बाधा आणा, मग बघाच..मिथुन चक्रवर्ती यांचा थेट बांग्लादेशी सैन्याला इशारा

Mithun Chakraborty : बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी थेट बांग्लादेशी सैन्याला इशारा दिला आहे. मिथुन चक्रवर्ती अभिनेते असण्याबरोबरच भाजप नेते सुद्धा आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून पश्चिम बंगालच्या राजकारणात ते भाजपसाठी काम करत आहेत.

Mithun Chakraborty : तुम्ही फक्त बॉर्डरवर फेंसिंगच्या कामात बाधा आणा, मग बघाच..मिथुन चक्रवर्ती यांचा थेट बांग्लादेशी सैन्याला इशारा
Mithun Chakraborty
| Updated on: May 29, 2026 | 8:51 AM

पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यापासून घुसखोर बांग्लादेशींचे धाबे दणाणले आहेत. त्यांची पळापळ सुरु आहे. विधानसभा निवडणूक प्रचारावेळीच भाजपने बांग्लादेशी घुसखोरांना त्यांच्या देशात पाठवून देणार असं जाहीर केलं होतं. बांग्लादेशींचा घुसखोरीचा मार्ग बंद करण्याचही आश्वासन दिलं होतं. त्यानुसार पश्चिम बंगाल सरकारकडून आता पावलं उचलली जात आहेत. पश्चिम बंगलामध्ये भाजपचं सरकार बनल्यानंतर अवघ्या 45 दिवसात सीमेवर कुंपण घालण्याचं काम वेगाने सुरु आहे. हे काम सुरु होताच कूचबिहारच्या ‘तीन बीघा कॉरिडोर’जवळ बॉर्डर गार्ड्स बांग्लादेशने (BGB) या कामात बाधा आणण्याचा प्रयत्न केला. अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांना ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही. त्यांनी बांग्लादेशच्या बॉर्डर गार्ड्सना इशारा दिला आहे.

कूचबिहारमध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी एका कॅन्सर सेंटरला भेट दिली. तिथे पत्रकारांशी बोलताना एका प्रश्नाच्या उत्तरात मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, “कुंपण घालण्याच्या कामात अडथळा आणणार असं BGB ने म्हटलं होतं. आता त्यांनी असं केलंच तर पुढे काय होतं ते पहावं” “मला या विषयावर जास्त काही बोलायचं नाही. कारण रागाच्या भरात मी काही उलट-सुलट बोलून जाईन” असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले. बांग्लादेश बीजीबीने काम थांबवण्याची धमकी दिलेली.

सत्तेत येताच भाजपाकडून दिलेला शब्द पूर्ण

सीमेवर कुंपण लावण्यासाठी बीएसएफला जमीन सोपवण्याच्या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या निर्णयाचं मिथुन चक्रवर्ती यांनी भरपूर कौतुक केलं. ‘सर्वप्रथम घुसखोरी रोखणं आवश्यक आहे. त्यासाठी तारांचं कुंपण घालणं आवश्यक आहे’ असं मिथुन म्हणाले. भाजपने निवडणूक प्रचारावेळी घुसखोरी रोखण्याचं आणि सीमेवर कुंपण घालण्याची घोषणा केली होती. सत्तेत येताच भाजपाने दिलेला शब्द पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे.

BSF आणि BGB मध्ये फ्लॅग मीटिंग

सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर 11 मे रोजी पहिल्या कॅबिनेट बैठकीतच बीएसएफला जमीन ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्याकडून बीएसएफला जमीन सोपवण्याचं काम वेगाने सुरु झालं. या निर्णयानुसार कूचबिहारच्या मेखलीगंजमध्ये तीन बीघा कॉरिडोरजवळ भूमी आणि भूमी सुधार विभागाचे अधिकारी जमिनीची मोजणी करण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्यांना विरोध करण्यात आला. बॉर्डर गार्ड्स बांग्लादेशने (BGB) जमीन सर्वेक्षणाच्या कामात बाधा आणण्याचा प्रयत्न केला. BGB च्या या विरोधानंतर सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी BSF आणि BGB ने एक फ्लॅग मीटिंग बोलावली होती.

Follow Us