काश्मीरच्या प्रत्येक वस्तूवर बहिष्कार टाका, मेघालयच्या राज्यपालांचं आवाहन

शिलाँग : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात जेवढा रोष व्यक्त केला जातोय, तेवढाच रोष दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक काश्मिरींविरोधातही व्यक्त होतोय. त्यातच आता मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी एक वक्तव्य केलंय, ज्यावरुन नवा वाद सुरु झालाय. काश्मीरच्या प्रत्येक गोष्टीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन तथागत रॉय यांनी केलंय. आर्मीच्या एका माजी कर्णलने आवाहन केलंय. काश्मीरला जाऊ नका, …

काश्मीरच्या प्रत्येक वस्तूवर बहिष्कार टाका, मेघालयच्या राज्यपालांचं आवाहन

शिलाँग : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात जेवढा रोष व्यक्त केला जातोय, तेवढाच रोष दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक काश्मिरींविरोधातही व्यक्त होतोय. त्यातच आता मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी एक वक्तव्य केलंय, ज्यावरुन नवा वाद सुरु झालाय. काश्मीरच्या प्रत्येक गोष्टीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन तथागत रॉय यांनी केलंय.

आर्मीच्या एका माजी कर्णलने आवाहन केलंय. काश्मीरला जाऊ नका, पुढचे दोन वर्ष अमरनाथला जाऊ नका, हिवाळ्यात कपडे विकायला येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून काश्मीरची कोणतीही वस्तू विकत घेऊ नका. काश्मीरच्या प्रत्येक वस्तूवर बहिष्कार टाका, मी याच्याशी सहमत आहे, असं ट्वीट तथागत रॉय यांनी केलं.

निवृत्त मेजर गौरव आर्य यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यांच्या ट्वीटला रिप्लाय करत तथागत रॉय यांनी आणखी एक ट्वीट केलं. गौरव आर्य यांनी ट्वीट केलं, की “भारतीय सैन्याने आपल्या शस्त्रांचा योग्य वापर केला तर काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते. पण आपण आपल्या लोकांसाठी काम करत असून संयमी रहायला हवं अस राजकीयदृष्ट्या आश्वस्त करण्यात आलंय.”

या ट्वीटला रिप्लाय करत तथागत रॉय यांनी ट्वीट केलं, की “पाकिस्तानी सेना (जी फुटीरतावाद्यांना सूचना देते) 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये होती. तिथे पाकिस्तानने बलात्कार आणि हत्या केल्या. भारताने मारलं नसतं तर आजही पूर्व पाकिस्तान याच पाकिस्तानकडे असता. आपणही तेवढ्याच दूर जावं याचा सल्ला मी देत नाही. पण किमान काही अंतर तरी निश्चित करायला नको का?”

यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही तथागत रॉय यांच्यावर निशाणा साधला. अब्दुल्ला यांनी ट्वीट केलं, की “याच कट्टरपंथी विचारधारेमुळे काश्मीरला आणखी खाली नेलंय. तथागत तुम्हाला एवढंच वाटतंय तर तुमच्यासाठी वीज निर्मिती करणाऱ्या काश्मीरच्या नद्यांचं पाणी वापरणंही बंद करा.”

तथागत रॉय यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं. “निवृत्त कर्णलच्या मतांशी सहमती दर्शवल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. पण ज्या पद्धतीने साडे तीन लाख काश्मिरी पंडितांना बाहेर काढण्यात आलं आणि शेकडो जवानांना मारण्यात आलं, त्याच्या तुलनेत ही अहिंसक प्रतिक्रिया आहे.”

काश्मीरवर राग कशामुळे?

पुलवामामध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने घेतली. हा हल्ला ज्या तरुणाकडून करण्यात आला, तो तरुण काश्मिरी तरुण होता. आदिल अहमद असं या तरुणाचं नाव आहे. यामुळेच देशभरातील विविध भागात राहणाऱ्या काश्मिरी तरुण आणि तरुणींना निशाणा बनवण्यात आलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *