भारताशिवाय तुर्कीमध्ये बिरयाणी शिजणं अशक्यच, सर्वात मोठं कारण समोर

Bharat Pakistan Tension, Boycott Turkey: भारताचा शत्रू पाकिस्तानचं समर्थन करणं तुर्कीला पडलंय महागात, आता तुर्कीत कशी शिजणार बिरयाणी? भारताशिवाया तुर्कीत बिरयाणी शिजणं अशक्यच..., तणावानंतर समोर आलं मोठं कारण

भारताशिवाय तुर्कीमध्ये बिरयाणी शिजणं अशक्यच, सर्वात मोठं कारण समोर
फाईल फोटो
| Updated on: May 16, 2025 | 1:56 PM

Bharat Pakistan Tension, Boycott Turkey: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताने भारतानावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय लष्काराने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न मोडून काढले. आता पण आता पाहिलं जात आहे की, या कठीण काळात भारताच्या शत्रूला कोणत्या कोणत्या देशांनी पाठिंबा दिला आहे. चीन नंतर पाकिस्तानचं समर्थन करणारा देश म्हणजे पाकिस्तान. पण पाकिस्तानचं समर्थन करणं आता तुर्कीला महागात पडणार आहे. कारण अनेक गोष्टींसाठी तुर्की भारतावर अवलंबून आहे. तुर्की येथील लोकं भारतातील तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांवर अवलंबून आहेत.

दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी संबंध आहेत. हा व्यवसाय 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. पण आता पाकिस्तानला पाठिंबा देणे तुर्कीला महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2023-24 मध्ये भारताने तुर्कीला 6.65 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली. भारतातून तुर्कीमध्ये बऱ्याच गोष्टी जातात. या यादीत तांदूळ, मसाले, कापड, चहा आणि कॉफी यांचा समावेश आहे.

भारतातून तुर्कीमध्ये मोठ्या प्रमाणात बासमती तांदूळ जातो. तुर्कीतील लोकांना भारतीय बासमती तांदळापासून बनवलेली बिर्याणी खायला प्रचंड आवडते. भारत तुर्कीला बिर्याणी बनवण्यासाठी वापरले जाणारे मसाले देखील पाठवतो. भारत इतर देशांना मोठ्या प्रमाणात बासमती तांदळाचा पुरवठा करतो. तुर्की देखील बासमती तांदळाची खरेदी भारताकडून करतो.

भारता शिवाय तुर्कीमध्ये बिरयाणी शिजणं अशक्यच

भारत तुर्कीला हळद, जिरे, धणे आणि लाल मिरची देखील पाठवतो. भारतीय मसाले त्यांच्या ताजेपणा आणि सुगंधासाठी जगभरात लोकप्रिय आहेत. भारतातून तुर्की कापूस, रेशीम आणि तयार कपडे देखील निर्यात केले जातात. त्यामुळे तिथे साड्या, कुर्ता, बेडशीट, पडदे खूप लोकप्रिय आहेत.
जर तुर्कीशी संबंध बिघडले तर कापड, तांदूळ आणि मसाल्यांच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. एवढंच नाही तर, दार्जिलिंगचा चहा आणि कॉफी भारतातून तुर्कीला पाठवला जातो. तुर्कीमध्ये चहा प्रचंड लोकप्रिय आहे.

उड्डाणे रद्द होण्याचं प्रमाण 250% वाढलं

पर्यटकांनी देखील तुर्कीकडे पाठ फिरवली आहे. यावेळी उड्डाणे रद्द होण्याचं प्रमाण 250 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. अनेक ट्रॅव्हल कंपन्या लोकांना यावेळी या देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन करत आहेत. शिवाय अनेक पर्यटक कंपन्यांनी तुर्की टूरसाठी प्रमोशन आणि ऑफरवर देखील बंदी घातली आहे. ज्यामुळे पर्यटक तुर्कीला जाणार नाहीत.