Delhi Murder : दिल्लीत बिल्डरची गोळ्या घालून हत्या, कारण अद्याप अस्पष्ट

इमारतीजवळ गाडीतून खाली उतरताच आधीच दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Delhi Murder : दिल्लीत बिल्डरची गोळ्या घालून हत्या, कारण अद्याप अस्पष्ट
गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 03, 2022 | 4:47 PM

दिल्ली : दिल्लीत भरदिवसा भरदिवसा एका बिल्डर (Builder)ची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. अमित गोयल असे हत्या केलेल्या बिल्डरचे नाव आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या गोयल यांना तात्काळ बालाजी अॅक्शन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दिल्लीतील पश्चिम विहार परिसरात ही घटना घडली आहे. गोळीबार (Firing) करणारे हल्लेखोर कारमध्ये आले होते. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, गोयल यांची हत्या कोणत्या कारणावरुन झाली याबाबत अद्याप समजू शकले नाही. दिल्ली पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

कार्यालयाजवळ येताच बिल्डरवर हल्ला

अमित गोयल हे मीरा बाग परिसरात राहत असून ज्वाला हेरी मार्केटच्या विकास टॉवरमध्ये बिल्डरचे कार्यालय आहे. ज्वाला हेरी मार्केट हे दिल्लीच्या प्रसिद्ध मार्केटपैकी एक आहे आणि या मार्केटमध्ये नेहमीच गर्दी असते. शनिवारी नेहमीप्रमाणे ते विकास टॉवरमधील आपल्या कार्यालयात आले होते. इमारतीजवळ गाडीतून खाली उतरताच आधीच दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली आहे.

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 9 पथके

आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी 9 टीम तयार केल्या आहेत. घटनेच्या वेळी अमित गोयल पार्किंगमध्ये कार पार्क करून आपल्या कार्यालयाकडे जात होते. पोलिसांना घटनास्थळावरून गोळ्यांचे रिकामे कवच सापडले आहे. या प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांची नऊ वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त विशेष कर्मचारी आणि इतर पथकेही तैनात करण्यात आली आहेत. पुढील तपास करण्यात येत आहे, असे डीसीपी आऊटर समीर शर्मा यांनी सांगितले. (Builder shot dead in Delhi for unknown reasons)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें