Mumbai Ahmedabad Bullet Train : बुलेट ट्रेनचे काम इतकं पूर्ण झालं, रेल्वेमंत्रालयाने जारी केला Video

मुंबई ते अहमदाबार बुलेट ट्रेन मार्गावरील नर्मदा, ताप्ती, माही आणि साबरमती नद्यांवरील पुलांचे काम अद्याप सुरु असल्याची माहिती हाय स्पीड रेल कॉरीडॉरच्या सूत्रांनी दिली आहे.

Mumbai Ahmedabad Bullet Train : बुलेट ट्रेनचे काम इतकं पूर्ण झालं, रेल्वेमंत्रालयाने जारी केला Video
shaft 2 Vikhroli. Mumbai to Ahmedabad Bullet TrainImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 6:31 PM

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर सुरु होणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे जुलै महिन्यातील काम कुठपर्यंत पूर्ण झाले आहे, याचा व्हिडीओच रेल्वे मंत्रालयाने जारी केला आहे. बुलेट ट्रेनच्या 508 किमी मार्गावरील पहिले सुरुवातीचे स्टेशन असलेल्या बीकेसी ( वांद्रे- कु्र्ला कॉप्लेक्स ) स्थानकाचे 100 खोदकाम झाले आहे. आता 24 पैकी आठ नद्यांवरील पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पार ( वलसाड जिल्हा ), पूर्णा (नवसारी जिला), मिन्धोला ( नवसारी जिल्हा ), अंबिका ( नवसारी जिल्हा ), औरंगा ( वलसाड जिल्हा ), वेंगानिया ( नवसारी जिल्हा ), मोहर ( खेडा जिल्हा ) आणि धाधर ( वडोदरा जिल्हा ) या नद्यांवरील पुलांचे काम संपले आहे.

बुलेट ट्रेनच्या गुजरात आणि महाराष्ट्रातील बांधकामांची सिव्हील कंत्राटांचे वाटप पूर्ण झाली आहेत. 321 किमीच्या मार्गापैकी 190 किमीचे पिअर वर्कचे काम पूर्ण झाले आहे. गुजरात, महाराष्ट्र ही राज्ये आणि दादरा नगर हवेली या केंद्र शासित भागातील जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेनच्या सर्व डेपो आणि इलेक्ट्रीक कामांची कंत्राटे पूर्ण झाली आहेत. विक्रोळी, नवीमुंबई आणि बीकेसी – शिलफाटा येथे 21 किमीचा भुयारी मार्ग तयार करण्यासाठी  टनेल मशिन आत टाकण्यासाठी शाफ्टचे काम सुरु आहे.

बुलेट ट्रेनच्या कामच्या प्रगतीचा व्हिडीओ येथे पाहा –

भारतात प्रथमच बलास्ट लेस ट्रॅकचे काम

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपानी शिंकानसेन ट्रॅक प्रणालीवर आधारित बलास्ट लेस ट्रॅकची J-स्लॅब ट्रॅक प्रणाली वापरण्यात येणार आहे. भारतात पहिल्यांदाच जे-स्लॅब बलास्ट लेस ट्रॅक सिस्टीमचा वापर होणार आहे. सुरत आणि आणंद येथे दोन अत्याधुनिक ट्रॅक स्लॅब निर्मिती केंद्र उभारण्यात आली आहेत. सुरत आणि वडोदरा येथे 35,000 MT पेक्षा जास्त JIS रेल आणि ट्रॅक कन्ट्रक्शन मशिनरीचे तीन सेट मिळाले आहेत.

• गुजरातमधील वलसाड येथील झारोली गावाजवळ 350 मीटर लांबीचा पहिला डोंगरातील बोगदा खोदून पूर्ण झाला आहे

• सूरत, आणंद आणि वडोदरा येथे अनुक्रमे 70 मीटर, 100 मीटर आणि 130 मीटरचे तीन स्टील पूलांचे काम पूर्ण झाले आहे.

• महाराष्ट्र राज्याच्या मुंबईतील बीकेसी आणि शिळफाटा दरम्यानच्या 21 किमी लांबीच्या बोगद्याचे काम सुरु झाले आहे. या बोगद्याचा 7 किमीचा भाग ठाणे खाडी घालून जाणार आहे.

• मुंबई बुलेट ट्रेन स्टेशनच्या बांधकामासाठी आणि समुद्राखालील बोगद्याच्या शाफ्टसाठी खोदकाम सुरू झाले आहे.

• महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.

2. गुजरातमधील कामाची प्रगती

– व्हायाडक्ट : एकूण – 352 किमी

– पाया : 338 किमी

– उभारलेले गर्डर्स : 5549

– गर्डर कास्टिंग : 222 किमी

– स्टेशन आणि डेपो

गुजरात राज्यातील स्थानेक आणि डेपोची कामे

– सर्व 8 बुलेट ट्रेन स्थानकांच्या  ( वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, आनंद, वडोदरा, अहमदाबाद आणि साबरमती ) च्या फाऊंडेशनचे काम पूर्ण झाले आहे.

– वापी – रेल्वे स्तरावरील स्लॅब पूर्ण झाला आहे

– बिलीमोरा – प्लॅटफॉर्म स्तरातील स्लॅब पूर्ण झाला आहे

– सुरत – 770/815 मीटर प्लॅटफॉर्म स्लॅब पूर्ण झाला आहे

– आणंद – 820/830 मीटर प्लॅटफॉर्म स्लॅब पूर्ण झाला आहे

– अहमदाबाद– 60/415 मीटर प्लॅटफॉर्म स्लॅब पूर्ण झाला आहे

– भरुच – 350/450 मीटर रेल्वे लेव्हल स्लॅब पूर्ण झाला आहे

– सुरत डेपो – स्ट्रक्चरलची काम पूर्ण झाली आहेत. अर्थ वर्क पूर्ण करून ट्रॅक टाकण्याच्या कामासाठी कंत्राटाचे वाटप झाले आहे.

– साबरमती डेपो – अर्थ वर्क पूर्ण झाले ; OHE फाऊंडेशनचे काम प्रगतीपथावर आहे. प्रशासकीय इमारतीसाठी आरसीसीचे काम सुरू आहे. विविध शेड / वर्कशॉपच्या फाउंडेशनचे काम सुरू आहे

महाराष्ट्रातील कामांची प्रगती

• महाराष्ट्रातील मुंबई बुलेट ट्रेनच्या स्थानकाची कामे विविध टप्प्यावर सुरू आहेत. आणि सिकेंट पाईलचे ( secant pile ) काम 100 टक्के पूर्ण झाले आहे.

• 5,72,560 क्युबिक मीटरचे खोदकाम झाले आहे. अँकर फिक्सिंगचे काम सुरू झाले आहे.

• विरार, बोईसर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्टेशनसाठी GTI काम पूर्ण झाले आहे.

7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.