AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदींच्या विजयाने पाकिस्तानी व्यावसायिक खूश, त्यांच्याच पंतप्रधानांना सुनावलं

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्याने काही पाकिस्तानच्या व्यावसायिकांना देखील आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हॅट्ट्रीकने देशातच नाही तर संपूर्ण जगात चर्चा मिळवली आहे. अनेक देशांच्या प्रमुखांनी मोदींचे अभिनंदन केले आहे. पाकिस्तानने मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे.

नरेंद्र मोदींच्या विजयाने पाकिस्तानी व्यावसायिक खूश, त्यांच्याच पंतप्रधानांना सुनावलं
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 08, 2024 | 7:51 PM
Share

लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवल्यानंतर आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार आहेत. जगभरात मोदींच्या विजयाची चर्चा आहे. जागा कमी जिंकल्या असल्या तरी मित्रपक्षाच्या मदतीने पंतप्रधान मोदी सरकार स्थापन करणार आहेत. मोदींच्या विजयाचा डंका भारतातच नाही तर विदेशात ही आहे. कारण पाकिस्तानी वंशाच्या एका अमेरिकन व्यावसायिकाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रियेच्या शांततापूर्ण आणि यशस्वी वर्तनाबद्दल भारतीय जनतेचे अभिनंदन केले आहे. पाकिस्तानी व्यावसायिकाने म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशिया प्रदेशातील स्थिरतेची हमी आहेत.

पाकिस्तानी-अमेरिकन उद्योगपती साजिद तरार यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मी नेहमीच म्हटलंय की, भविष्यात भारताच्या स्थैर्यासाठी मोदींचे नेतृत्व आवश्यक आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक पक्षांना येण्यापासून आणि संविधानाला अस्थिर करण्यापासून रोखता येऊ शकते. मोदींचे नेतृत्व ही भारताची स्थिरता आणि भारताचे भविष्य याची हमी आहे.

पुढे ते म्हणाले की, मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे त्यामुळे पाकिस्तानच्या जनतेच्या मनात एक आशेचा किरण आहे की त्यांचे भारतासोबत संबंध सुधारु शकतील. एका प्रश्नाला उत्तर देताना तरार म्हणाले की, ‘मोदींच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ उपस्थित राहतील अशी मला आशा आहे. पण त्यांच्याकडून अद्याप मोदींचं अभिनंदत करणारा संदेश आलेला नाही ही निराशाजनक बाब आहे.’

ते म्हणाले, “मोदी केवळ भारतासाठीच नाही तर पाकिस्तानसाठी देखील महत्त्वाचे आहेत. त्यांच्यावर इस्लामविरोधी आणि पाकिस्तानविरोधी असल्याचा आरोप हा राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मोदींच्या येण्याने जर पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारले तर दोन दक्षिण आशियाई देशांमधील व्यापार वाढेल.

“मोदी हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी आता ब्रिक्स आणि जी-20 सारख्या विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर काम केले आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुका यशस्वीपणे पार पडल्याबद्दल अभिनंदन करताना ते म्हणाले, “ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे आणि भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्य आणि लवचिकतेचा दाखला आहे.” भारताच्या लोकशाही प्रक्रियेच्या ताकदीवर शंका घेणाऱ्या लोकांना या निवडणुकीने शांत केले आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले, “भारताची लोकशाही मजबूत आहे, अमेरिकेपेक्षाही मजबूत आहे,”

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!