AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EVM Election : नवीन ईव्हीएम यंत्रांवर निवडणुकांचा भार! या सरकारी कंपन्यांना मिळाले 1335 कोटींचे कंत्राट

EVM Election : नवीन ईव्हीएम मशिनचे कंत्राट या सरकारी कंपन्यांना मिळाले आहे. त्याचा गुंतवणूकदारांना फायदा होईल.

EVM Election : नवीन ईव्हीएम यंत्रांवर निवडणुकांचा भार! या सरकारी कंपन्यांना मिळाले 1335 कोटींचे कंत्राट
ईव्हीएम सज्ज
| Updated on: Jan 18, 2023 | 6:23 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय राजकीय पटलावर सध्या घमासान सुरु आहे. अनेक मत प्रवाह आणि त्यांचे अंडरकरंट सातत्याने पहायला मिळत आहे. प्रत्येक राज्यात वेगळे महाभारत सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गाफिल न राहण्याचा महत्वपूर्ण सल्ला पक्षातील लोकांना दिला आहे. या वर्षांत 2023 मध्ये 9 राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) होत आहे. त्यातील 5 राज्य मोठी आहेत. तर पुढील वर्षात 2024 मध्ये लोकसभेचा (Lok Sabha Election) महासंग्राम रंगणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाने राजकीय जमीन कसायला सुरुवात केली आहे. नवीन ईव्हीएम मशीनवर (EVM Machine) येत्या निवडणुकांची मदार आहे.

नवीन निवडणुकांसाठी केंद्र सरकारने सरकारी कंपन्यांना नवीन ईव्हीएम मशीन (New EVM Machines) खरेदीचे कंत्राट दिले आहे. या मशीन या सरकारी कंपन्यांकडून केंद्र सरकार खरेदी करणार आहेत. या मशीनवरच यावर्षातील विधानसभा आणि पुढील वर्षातील लोकसभेची निवडणूक लढविण्यात येत आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) यांच्यावर नवीन ईव्हीएम मशिनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कंपन्यांकडे काम सोपविण्यासाठी कॅबिनेटने मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारने नवीन ईव्हीएम मशीनसाठी 1,335 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, नवीन ईव्हीएम मशीनसाठी कॅबिनेटने मंजूरी दिली. या नवीन ईव्हीएम मशीनसोबतच VV PATs पण अद्ययावत करण्यात येणार आहे. यावेळी हे काम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला देण्यात आले आहे.

ईव्हीएम मशीन खरेदीसाठी केंद्र सरकारने एकूण 1335 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या रक्कमेतूनच VV PATs अद्ययावत करण्यता येईल. या प्रक्रियेत VV PATs ला M2 आणि M3 सोबत बदलण्यात येणार आहे. याविषयीचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्रिुपरामध्ये विधानसभा निवडणुकांसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. तर मेघालय आणि नागालँडमध्ये एकाच दिवशी विधानसभेचे पडघम वाजतील. या दोन राज्यांत 27 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पूर्वोत्तरमधील तीन राज्यांतील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. या राज्यात निवडणूक आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे.

नागालँड विधानसभेचा कार्यकाळ 12 मार्च रोजी समाप्त होत आहे. तर मेघालय आणि त्रिपुरा या राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ क्रमशः 15 आणि 22 मार्च रोजी संपत आहे. या तीनही राज्यात विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत.

या तीन राज्यांपैकी त्रिपुरा राज्यात भाजपचे सरकार आहे. तर नागालँडमध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी सत्तेत आहे. मेघालयमध्ये सध्या नॅशनल पिपल्स पार्टीचे सरकार आहे. त्यापैकी मेघालयातील सत्ताधाऱ्यांच्या पक्षालाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.