AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीला हिजडा म्हणणे ही मानसिक क्रुरता, हायकोर्टाने पत्नी विरोधात सुनावला फैसला

हायकोर्टाने एका पतीच्या याचिकेवर घटस्फोटाला मंजूरी देत अशा प्रकारे पतीला हिजडा म्हणणे मानसिक क्रुरता असल्याचे स्पष्ट केले आहे.

पतीला हिजडा म्हणणे ही मानसिक क्रुरता, हायकोर्टाने पत्नी विरोधात सुनावला फैसला
| Updated on: Oct 22, 2024 | 4:47 PM
Share

पत्नी जर पतीला हिजडा म्हणून हिणवत असेल तर तो एक प्रकारचा मानसिक क्रुरतेचा प्रकार होतो असा निकाल पंजाब हरियाणा हायकोर्टाने दिला आहे. न्यायमूर्ती सुधीर सिंह आणि जसजीत सिंह बेदी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून हे खंडपीठ घटस्फोटाच्या एका प्रकरणावर सुनावणी घेत होते. यापूर्वी १२ जुलै रोजी फॅमिली कोर्टाने पतीच्या बाजूने निकाल देत घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला होता. आपली सून नवऱ्याला हिजडा म्हणून त्याचा उपमर्द करते असा आरोप महिलेच्या सासूने  केला होता.

या खंडपीठाने निकाल देताना सांगितले की फॅमिली कोर्टाने दाखल केलेले रेकॉर्ड आणि सर्वौच्च न्यायालयाच्या निकालांना ध्यानात घेतले असता या महिलेने जे काही केले आहे ती क्रुरता म्हटली जाऊ शकते. पतीला हिजडा संबोधणे किंवा कुठल्या आईला तूने हिजड्याला जन्म दिला असे म्हणणे क्रुरता आहे असे खंडपीठाने म्हटले आहे.

पत्नी पॉर्न फिल्म पहाते

या दाम्पत्याचा विवाह साल 2017 मध्ये झाला होता. आपली पत्नी रात्री उशीरापर्यंत जागते आणि आपल्या आजारी आईला खालच्या मजल्यावरुन बेडरुममध्ये जेवण आणायला सांगते अशी तक्रार पतीने घटस्फोटाच्या अर्जात केली होती. पत्नीला पॉर्न फिल्म पाहण्याचा शौक आहे  आणि मोबाईल गेम खेळायची सवय आहे. पत्नी रात्री उशीरापर्यंत शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करते.तसेच 10 ते 15 मिनिटांचा संबंध असायला हवा असा दबाव टाकते. दररोज तीन वेळा शारीरिक संबंध ठेवण्यास सांगते असा आरोप पतीने पत्नीवर केला होता.

पत्नीने केला होता आरोप

पत्नी आपल्याला शारीरिक रुपाने आजारी असल्याचे टोमणे मारायची आणि कोणा दुसऱ्याशी विवाह करायचा आहे असे म्हणायची असा आरोप पतीने याचिकेत केला होता. तर पत्नीने पतीने तिला घराबाहेर काढल्याचा आरोप केला होता. सासरची लोकं आपल्याला नशेच्या गोळ्या द्यायचे आणि बेशुद्ध झाल्यावर मांत्रिकाने दिलेला ताविज गळ्यात घालायचे आणि आपल्याला कसले तरी पाणी पाजून वश करायला पाहायचे असाही आरोप पत्नीने केला होता.

न्यायालयाने काय म्हटले

पती आणि सासूच्या जबाबालाच फॅमिली कोर्टाने खरे मानले आहे असा आरोप पत्नीने याचिकेत केला होता. हायकोर्टाने यावर सुनावणी करताना पती आणि पत्नी गेली सहा वर्षे वेगळे रहात आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र आणणे अशक्य आहे असे म्हटले. त्यामुळे पत्नीची याचिका फेटाळत आहोत आणि फॅमिली कोर्टाचा निकाल आपण कायम राखत आहोत असे हायकोर्टाच्या खंडपीठाने निकाल देताना म्हटले आहे.

Follow Us
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?