AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर होस्टेसला खरच लग्न करता येत नाही का? जाणून घ्या काय आहे नियम?

अनेकांच्या मनामध्ये विमान प्रवासाबद्दल कायमच कुतुहल असतं. विशेष: विमानात ज्या एअर होस्टेस आहेत, ज्यांना आपण फ्लाइट अटेंडेंट देखील म्हणतो त्यांना पाहून मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. अनेकांना त्यांचा हेवा देखील वाटतो, मात्र ही नोकरी वाटते तितकी सोपी नसते.

एअर होस्टेसला खरच लग्न करता येत नाही का? जाणून घ्या काय आहे नियम?
air hostessImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 26, 2026 | 8:15 PM
Share

प्रत्येकालाच विमान प्रवास आवडतो, मात्र विमानाचं भाडं हे इतर प्रवासाच्या तुलनेनं खूप जास्त असल्यानं अनेकजण इच्छा असूनही विमान प्रवास करू शकत नाहीत. तसेच जे लोक आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच विमान प्रवास करत असतात त्यांच्या आपल्या पहिल्या प्रवासाबद्दल वेगळ्याच भावना असतात. त्यांना आपल्या पहिल्या प्रवासाबद्दल प्रचंड कुतुहल असतं, आणि सोबत भीती देखील वाटत असते. तुम्ही जेव्हा विमानाने प्रवास करता तेव्हा तुम्ही विमानात एअर होस्टेसला पाहिलेच असेल ज्याला आपण फ्लाइट अटेंडेंट असं देखील म्हणतो. या एअर होस्टेसला पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात या नोकरीबद्दल हेवा निर्माण होतो, आपणही फ्लाइट अटेंडेंट असावं असं वाटू लागतं. मात्र तुम्ही विचार करता तेवढी सोपी ही नोकरी नक्कीच नसते. एअर होस्टेसवर मोठी जबाबदारी असते.

एअर होस्टेसचं काम प्रवाशांना केवळ अन्न-पाणी पुरवणं एवढंच नसतं. तर प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणं, प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा देणं, जर काही एमरजन्सी असेल तर अशावेळी त्या प्रवाशाला तातडीने मदत करणं ही काम देखील एअर होस्टसला करावी लागतात. त्यामुळे हा जॉब खूप जबाबदारीचा असतो. त्यामुळे एअर हेस्टेसचा जॉब बाहेरून कितीही भारी वाटत असला तरी मात्र आतून एक जबाबदारीचं ओझं या जॉबमध्ये असतं.

जेव्हा तुम्ही विमानात एअर होस्टेसला पहाता तेव्हा तुमच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, त्यातील सर्वाधिक पडणारा प्रश्न असतो की एअर होस्टेस लग्न करू शकतात का? तर याच उत्तर आहे होय, एअर होस्टेस निश्चितपणे आता लग्न करू शकतात. पूर्वी काही काही विमान कंपन्यांनी तशी अट घातली होती, त्यामुळे जॉब सुरू असताना एअर होस्टेसला लग्न करता येत नव्हतं. तसेच जर लग्न केलं तर नोकरी सोडावी लागायची. मात्र आता तसं नाहीये, लग्न करणं किंवा न करणं हे त्या एअर होस्टेसचा वैयक्तिक विषय असल्याची मान्यता जवळपास सर्वच कंपन्यांनी दिली आहे. त्यामुळे आता नियम बदलले आहेत. एअर होस्टस लग्न करू शकते. तसेच ती प्रेग्नेंट असेल तर तिला नियमानुसार कंपनीकडून भरपगारी सुट्टी देखील द्यावी लागते. त्यानंतर ती पुन्हा एकदा आपला जॉब सुरू करू शकते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल