AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

G-20: या देशाच्या पंतप्रधानांच्या विमानाला म्हणतात ‘फ्लाइंग ताजमहाल’? कोणी दिले होते हे नाव

जस्टिन ट्रुडो ८ सप्टेंबरला G20 summit मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. पण तेव्हापासून ते भारतातच आहेत. कारण त्यांच्या विमानात बिघाड झाला आहे.

G-20: या देशाच्या पंतप्रधानांच्या विमानाला म्हणतात ‘फ्लाइंग ताजमहाल’? कोणी दिले होते हे नाव
| Updated on: Sep 12, 2023 | 6:10 PM
Share

नवी दिल्ली : G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले पाहुणे परतले आहेत. पण कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो अजूनही भारतातच अडकले आहेत. त्यामागचे कारण म्हणजे त्याचे विमानात बिघाड झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान परतण्यापूर्वी त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे ते कॅनडासाठी रवाना होऊ शकले नाहीत. जी-20 परिषद रविवारी संपली आहे. तेव्हापासून ट्रुडो भारतात अडकले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडाचे पीएम ट्रूडो ज्या विमानाने जाणार होते त्याचे नाव CC-150 Polaris (फ्लाइंग ताजमहाल) आहे. G-20 शिखर परिषद संपल्यानंतर रविवारी संध्याकाळी ते परतणार होते, मात्र अचानक विमानात बिघाड झाला, त्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. ट्रुडो ज्या विमानाने प्रवास करणार होते ते विमान सुमारे 35 वर्षे जुने आहे. हे विमान 1990 पासून वापरले जात आहे.

8 सप्टेंबरला भारतात पोहोचलेले ट्रुडो

जस्टिन ट्रुडो 8 सप्टेंबरला भारतात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ते आज रात्रीपर्यंत परत जावू शकतात. त्यांच्यासाठी पर्यायी विमान (CC-150 Polaris) कॅनडातून मागवण्यात आले आहे, जे लंडनमार्गे येत आहे. आज दुपारी ते पोहोचले आहे. सध्या पंतप्रधान ट्रुडो आपल्या कुटुंबासोबत त्याच हॉटेलमध्ये आहेत जिथे ते आधी थांबले होते.

ट्रुडोच्या विमानात यापूर्वीही बिघाड

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या विमानात बिघाड होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2016 मध्येही त्यांचे विमान तुटले होते. टेकऑफनंतर ३० मिनिटांनी त्याला ओटावाला परतावे लागले. वास्तविक, ही घटना त्यांच्या बेल्जियम दौऱ्यादरम्यान घडली. 2019 मध्ये देखील या विमानात एक बिघाड झाला होता, जेव्हा कॅनडातील एअरबेसवर ते आदळले होते.

‘फ्लाइंग ताजमहाल’ची वैशिष्ट्ये

त्याची श्रेणी 10,000 किलोमीटर (6,200 मैल) आहे. या विमानात 240 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. क्षेपणास्त्रांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ते स्वसंरक्षण प्रणालीने सुसज्ज आहे. या विमानाच्या ऑपरेशनची किंमत प्रति तास $ 100,000 आहे.

‘फ्लाइंग ताजमहाल’ नाव कोणी दिले?

पंतप्रधानांचे अधिकृत विमान CC 150 Polaris याला ‘फ्लाइंग ताजमहाल’ म्हणूनही ओळखले जाते. CC 150 पोलारिस विमान प्रत्यक्षात एअरबस 310-300 आहे. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला कॅनडाचे तत्कालीन विरोधी पक्षनेते जीन क्रेटीएन यांनी याला ‘फ्लाइंग ताजमहाल’ असे नाव दिले.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.