खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून सीमांवर परत यावं, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन

पंजाबचे मुख्यंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Captian Amarinder Singh)यांनी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर परतण्याचं आवाहन केले आहे.

खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून सीमांवर परत यावं, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन
अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 7:30 PM

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Captian Amarinder Singh)यांनी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर परतण्याचं आवाहन केले आहे. दिल्लीत आज जे घडलं ते चकित करणार दृश्य होते. ट्रॅक्टर रॅली दरम्यान समाजकंटकांनी केलेली हिंसा कधीही स्वीकारली जाणार नाही. शांततेच्या मार्गानं सुरु असलेल्या आंदोलनाला आजच्या घटनेने छेद गेला आहे. शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांनी हिंसक घटनेपासून दूर ठेवलं आहे. ट्रॅक्टर रॅली स्थगित करण्यात आली आहे. सर्व खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीमधून परत सीमांवर यावं, असं आवाहन कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलेय. (Captian Amarinder Singh urge all genuine farmers to vacate Delhi & return to borders )

पंजाबमध्ये हाय अ‌ॅलर्ट

दिल्लीत शेतकरी आंदोलनात झालेल्या हिसांत्मक घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरिंदरसिंग यांनी पंजाबमध्ये हाय अ‌ॅलर्ट जारी केला आहे. राज्याचे DGP दिनकर गुप्ता यांना आदेश देत राज्यात हिंसात्मक घटना होऊ नयेत, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनामध्ये झालेली हिंसा काही घटकांकडून करण्यात आली असावी, असा संशय ही त्यांनी व्यक्त केला. दिल्ली पोलीस आणि शेतकरी संघटनांमध्ये सहमतीनं ठरलेल्या नियमांचं उल्लंघन त्याच शक्तींकडून झालं असावं, असं पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले. समाजकटकांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला ठेच पोहोचल्याचं अमरिंदरसिंग म्हणाले. ऐतिहासिक लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनेबद्दल अमरिंदरसिंग यांनी निषेध व्यक्त केला आहे.

केंद्राशी चर्चा सुरु ठेवा

अमरिंदरसिंग यांनी शेतकऱ्यांना दिल्लीतून परतण्याचं आवाहन केले. दिल्लीच्या सीमांवर असलेल्या तंबूत परतावं आणि शेतकऱ्यांशी चर्चा सुरु ठेवण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शेतकऱ्यांचं आतापर्यंत लोकशाही पद्धतीनं सुरु असलेल्या शांततेतील आंदोलनाला भारत आणि देशातील शेतकऱ्यांकडून समर्थन मिळत असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग म्हणाले.

राहुल गांधींचे शांततेचे आवाहन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणतीही समस्या सोडण्यासाठी हिंसा हा त्याचा पर्याय असूच शकत नाही. कुणालाही मार लागला तरी आपल्या देशाचंच नुकसान होणार आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. मोदी सरकारनं तात्काळ तीन कायदे मागे घ्यावेत, असं राहुल गांधी म्हणाले.

संबंधित बातम्या:

हा माणूस कृषी मंत्री होता याचं आश्चर्य, इतकं निर्लज्जपणे कसं बोलू शकतो, भाई जगताप कडाडले

Delhi Farmers Tractor Rally: हिंसा हा पर्याय नाही; शेतकरी आंदोलनावर राहुल गांधींसह कोण काय म्हणालं?

(Captian Amarinder Singh urge all genuine farmers to vacate Delhi & return to borders )

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.