AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satypal Malik : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरासहीत 30 ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी, मलिक म्हणाले, चार शर्ट आणि…

मी गेल्या ३-४ दिवसांपासून आजारी असून रुग्णालयात आहे. असे असतानाही माझ्या घरावर छापे टाकले जात आहेत. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही, असे सत्यपाल मलिक म्हणाले. किरू हायड्रो प्रोजेक्टशी प्रकरणी मलिक यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला.

Satypal Malik : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरासहीत 30 ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी, मलिक म्हणाले, चार शर्ट आणि...
| Updated on: Feb 22, 2024 | 2:10 PM
Share

नवी दिल्ली | 22 फेब्रुवारी 2024 : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. मलिक हे रुग्णालयात दाखल असतानाच सीबीआयने ३० ठिकाणी छापे मारत ही कारवाई केली. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, या छाप्यांमुळे मी घाबरणार नाही असे सांगत मलिक यांनी ट्विट केले. मी गेल्या ३-४ दिवसांपासून आजारी असून रुग्णालयात दाखल आहे. असे असतानाही माझ्या घरावर छापे टाकले जात आहेत. माझ्याकडे ( घरात) 4-5 कुर्ते आणि पायजम्याशिवाय काहीही मिळणार नाही, असे सांगत त्यांनी या छाप्यांमुळे आपण घाबरणार नसल्याचे स्पष्ट केले. किरू हायड्रो प्रोजेक्टशी प्रकरणी मलिक यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. यापूर्वी सीबीआयने विमा घोटाळ्याप्रकरणी मलिक यांच्यावर कारवाई केली होती. याआधीही सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील सत्यपाल मलिक आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले होते.

हे छापे टाकून माझा ड्रायव्हर आणि माझ्या सहाय्यकालाही नाहक त्रास दिला जात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे मलिक म्हणाले. सीबीआयच्या पथकाने मलिक यांच्या घरासह अन्य 30 ठिकाणी देखील छापे मारत कारवाई केली.

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, घाबरणार नाही, झुकणार नाही

जे भ्रष्टाचारात सहभागी आहेत, अशी ज्यांच्याबद्दल मी तक्रार केली होती त्यांची चौकशी करण्याऐवजी माझ्या निवासस्थानावर सीबीआयने छापे टाकले. माझ्याकडे 4-5 कुर्ते आणि पायजमे यांच्याशिवाय काहीही सापडणार नाही. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून हुकूमशहा मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी घाबरणार नाही आणि झुकणार नाही, असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, किश्तवाडमधील किरू जलविद्युत प्रकल्पासाठी 2,200 कोटी रुपयांचे नागरी कामाचे कंत्राट देण्यात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 2019 मध्ये हा छापा टाकण्यात आला होता. 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 या कालावधीत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असलेले मलिक यांनी या प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मिटवण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता.

सीबीआयने दाखल केली होती FIR

मलिक यांनी लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात सीबीआयने एक एफआयआर दाखल केली होती. चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स पॉवर लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी आणि इतर माजी अधिकारी एमएस बाबू, एमके मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

कीरू हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे तरी काय ?

कीरू हायइड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट हा जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदी वर प्रस्तावित आहे. मोदी सरकारच्या कॅबिनेटने 2019 साली चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडला या प्रोजेक्टसाठी गुंतवणुकीची परवानगी दिली होती. त्याचे काम अजून सुरू असून हा प्रोजेक्ट 2025 साली पूर्ण होईल असा अंदाज आहे.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.