AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Price Today : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आजपासून एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त; किमतीत मोठी घट, तब्बल..

LPG Price Cut : 1 जुलैपासून सरकारने मोठा दिलासा लोकांना दिला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली. आता एलपीजी गॅस स्वस्तामध्ये मिळणार आहे. हे केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट म्हणावे लागेल.

LPG Price Today : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आजपासून एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त; किमतीत मोठी घट, तब्बल..
LPG Price Cut
| Updated on: Jul 01, 2026 | 7:42 AM
Share

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारकडून लोकांना मोठे गिफ्ट देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून देशभरात एलपीजी गॅसच्या किमतीत सतत वाढ होताना दिसली. यासोबतच एलपीजी गॅसचा मोठा तुटवडाही होता. सतत भाव वाढत असल्याने घरांचे आर्थिक गणित बिघडत होते. यादरम्यानच आता अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत तब्बल 183.50 रुपयांपर्यंत मोठी कपात केली आहे. हा मोठा दिलासा आहे. कारण मागील काही महिन्यांपासून फक्त भाव वाढ होत होती. आता कुठेही दिलासा मिळाला. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती सतत वाढत होत्या. याचा हॉटेल चालक आणि ग्राहकांना थेट फटका बसला. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये जरी कपात केली असली तरीही अजून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीपेक्षा इराण आणि अमेरिका युद्धात व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर सतत वाढताना दिसले होते. 1 जुलैलाच सरकारकडून हा दिलासा मिळाला. इराण आणि अमेरिका युद्ध 3 महिने सुरू होते. यादरम्यान सतत एलपीजी गॅसचा तुटवडा होता. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली. ज्यामुळे एलपीजी गॅस मिळत नव्हता.

यादरम्यानच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही वाढत होत्या. ज्यामुळे सतत एलपीजी महागत होता. युद्ध थांबून काही आठवडे झाले. यादरम्यानच सरकारने एलपीजी गॅसच्या कितमी कमी करण्याचा निर्णय घेतला. आता लवकरच घरगुती गॅस सिलेंडरबाबतही मोठी घोषणा होऊ शकते, असा अंदाज आहे.

नवीन दरांनुसार, दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरची किंमत 2,930 रुपये असेल. ही किंमत आधीच्या 3,113.50 रुपयांच्या तुलनेत कमी असून, यामुळे ग्राहकांना 183.50 रुपयांचा दिलासा मिळाला आहे. 1 डिसेंबर 2025 रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,580.50 होती. जानेवारीत 2026 मध्ये त्यात वाढ होऊन 1,691.50 झाली. सतत सिलेंडरच्या किमतीत वाढ होऊ 3 हजाराच्या आसपास व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती पोहोचल्या. आता कुठे दिलासा मिळाला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ