तेलंगाणाला मिळणार 4 केंद्रीय विद्यालय, केंद्राची मंजुरी, जी किशन रेड्डींनी मानले मोदींचे आभार!

नुकतेच केंद्र सरकारने तेलंगाणा राज्यासाठी तीन केंद्रीय विद्यालयांना मंजुरी दिली. या राज्यात अगोदरच 35 केंद्रीय विद्यालये आहेत. असे असताना आता या राज्याला आणखी तीन केंद्रीय विद्यालयांची मान्यता देण्यात आलेली आहे.

तेलंगाणाला मिळणार 4 केंद्रीय विद्यालय, केंद्राची मंजुरी, जी किशन रेड्डींनी मानले मोदींचे आभार!
g kishan reddy and kendirya vidyalay
| Updated on: Oct 01, 2025 | 6:46 PM

G Kishan Reddy : तेलंगाणा राज्यात शिक्षण क्षेत्रात प्रगती व्हावी म्हणून गेल्या 11 वर्षांत केंद्र सरकारने तेथील राज्य सरकारला जमेल त्या मार्गाने सहकार्य केलेले आहे. आता नुकतेच केंद्र सरकारने तेलंगाणा राज्यासाठी तीन केंद्रीय विद्यालयांना मंजुरी दिली. या राज्यात अगोदरच 35 केंद्रीय विद्यालये आहेत. असे असताना आता या राज्याला आणखी तीन केंद्रीय विद्यालयांची मान्यता देण्यात आलेली आहे. केंद्राच्या या निर्णयाचा आता तेलंगाणा राज्याला मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

कोणकोणत्या भागांत केंद्रीय विद्यालयांना मंजुरी

जी किशन रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार सतत स्थलांतर होणाऱ्या केंद्र सरकारचे कर्मचारी, संरक्षण दलातील, अर्धसैनिक दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात तसेच या मुलांना समान शिक्षण मिळवता यावे यासाठी केंद्रीय विद्यालय महत्त्वाची भूमिका पार पाडते. या चार केंद्रीय विद्यालयांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण माध्यमिक तसेच प्राथमिक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यातील पहिले केंद्रीय विद्यालय हे भद्राद्री कोठागुडेम जिल्हा मुख्यालय, दुसरे विद्यालय मुलुगु जिल्हा मुख्यालय, तिसरे विद्यालय जगित्याल जिल्ह्यातील चेलागल येथे तर चौथे विद्यालय हे वनपर्थी जिल्ह्यातील नागवरम शिवर येथे उभारण्यात येणार आहे.

पीएम-श्री शाळांसाठी 400 कोटींची तरतूद

तसेच, गेल्या कित्येक दशकांपासून भद्राद्री कोठागुडेम आणि मुलुगु जिल्ह्यांत उग्रवादी विचारांचा प्रवाह आहे. या जिल्ह्यांतही केंद्रीय विद्यालयांची स्थापना होणार असल्याने आता शिक्षणाची नवी संधी निर्माण होणार आहे. याशिवाय शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत 800 पेक्षा जास्त पीएम-श्री शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण माध्यमिक शिक्षणासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. गेल्या दोन वर्षांत तेलंगाणा राज्यातील पीएम-श्री शाळांसाठी सर्वाधिक निधी देण्यात आलेला आहे, अशी माहितीही जी किशन रेड्डी यांनी दिली आहे.

जी किशन रेड्डी यांनी मानले आभार

केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत तेलंगाणा राज्याला जवळपास 2000 कोटी रुपये दिलेले आहेत. याव्यतिरिक्त केंद्र सरकारने मुलुगु जिल्ह्यात सम्मक्का आणि सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठांची स्थापना करण्यासाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. दरम्यान, याच तरतुदींमुळे केंद्रातील कोळसा आणि खाणमंत्री जी किशन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.

Follow Us