आदिवासी समुदायाच्या उत्थानासाठी आता सरकारचे आदी कर्मयोगी अभियान; काय केलं जाणार?
आदिवासी व्यवहार मंत्रालयातर्फे आज (19 ऑगस्ट) 'आदी कर्मयोगी अभियाना'चा शुभारंभ करण्यात आला. आदिवासी पाड्यातील लोकांना सक्षम बनवणे तसेच स्थानिक नेतृत्त्वाला संधी मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृरदर्शी नेतृत्त्वात या अभियानाला आता सुरुवात करण्यात आली आहे.

आदिवासी व्यवहार मंत्रालयातर्फे आज (19 ऑगस्ट) ‘आदी कर्मयोगी अभियाना’चा शुभारंभ करण्यात आला. आदिवासी पाड्यातील लोकांना सक्षम बनवणे तसेच स्थानिक नेतृत्त्वाला संधी मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृरदर्शी नेतृत्त्वात या अभियानाला आता सुरुवात करण्यात आली आहे. आदी कर्मयोगी अभियान हे सेवा, संकल्प आणि समर्पण या मूलमंत्रावर आधारलेले असेल.
आदी कर्मयोगी अभियानाचा उद्देश काय?
गावपातळीवर उत्तरदायी आणि लोककेंद्रित शासनास प्रोत्साहन देणे. राज्य, जिल्हा, तालुका तसेच गावपातळीवर मल्टी डिपार्टमेंटल गव्हर्नंस लॅब वर्कशॉपचे आयोजन करणे. तसेच राज्य, जिल्हा, ब्लॉक पातळीवरील प्रशिक्षकांच्या क्षमतेत वाढ करणे.
आदिवासी समुदाय तसेच शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ठोस योजना आणि गुंतवणूक धोरणातून ‘एक लाख आदिवासी गावे-व्हिजन 2030’ ची निर्मिती करणे.
550 जिल्हे, 30 राज्य, केंद्रशाशित प्रदेशात 20 लाख परिवर्तन घडवून आणणाऱ्या नेत्यांचे नेटवर्क उभे करणे, आदी या अभियानाची मुख्य उद्दीष्टे आहेत.
या अभियानाच्या माध्यमातून काय काम केलं जाणार?
या अभियानाच्या माध्यमातून आदिवासीबहूल गावांत शासकीय अधिकारी, समुदायाचे सदस्य तेथील समस्या सोडवण्यासाठी प३त्येक पंधरा दिवसांत 1-2 तास वेळ देतील. यावेळी तेथील स्थानिक अडचणी सोडवल्या जातील. युवकांना मार्गदर्शन केले जाईल.
स्थानिक ग्रामस्थ आणि शासकीय अधिकारी संयुक्तपणे आदिवासी गाव व्हिजन 2030 तयार करतील. हे व्हिजन तयार करताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शास्वत विकासाच्या धोरणाला अनुसरून असेल.
या अभियानाच्या माध्यमातून सर्व शासकीय योजना आदिवासी भागापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जाईल. या अभियानाच्या माध्यमातून शिक्षक, डॉक्टर तसेच अन्य नोकरदार आदिवासी समुदायाला मार्गदर्शन करतील आणि त्यांना प्रोत्साहित करतील. अशा लोकांना आदी सहयोगी म्हटले जाईल.
या मोहिमेत स्वयं सहायता गट, एनआरएलएम सदस्य, आदिवासी भागातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ व्यक्ती, स्थानिक नेते हेदेखील सहभागी होतील. या मोहिमेच्या माध्यमातून आदिवासी समाजातील युवक, महिला, या समुदायातील नेते यांनी समस्यांवर उपाय शोधावा यासाठी क्षमता निर्मिती कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. या अभियानाच्या माध्यमातून साधारण एक लाखांपेक्षा अधिक आदिवासी-बहुल गांवांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
