चंदीगड विद्यापीठ म्हणतं, ‘असा’ काय प्रकार घडलाच नाही…

चंदीगड विद्यापीठातील 60 अंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनींचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे वृत्त जाहीर झाले होते. त्यामधील काही विद्यार्थिनीनी आत्महत्याही करण्याचा प्रयत्न केला, पण आता मुख्यमंत्र्यांनीच असा काय प्रकार घडलाच नाही असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

चंदीगड विद्यापीठ म्हणतं, 'असा' काय प्रकार घडलाच नाही...
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 4:09 PM

चंदीगडः मोहालीतील चंदीगड विद्यापीठातील (Chandigarh University) अंघोळ करणाऱ्या 60 विद्यार्थिनींचा व्हिडीओ व्हायरल (60 Student MMS Viral) झाला आहे. याप्रकरणी एका विद्यार्थिनीला अटक केली आहे. महिला आयोगानेही या प्रकरणी माहिती मागवली असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांच्याबरोबर चर्चा चालू केली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात आत्महत्या (Suicide) वगैरे काही झाले नाही. तर या प्रकरणातील ज्या विद्यार्थिनीला ताब्यात घेतले आहे, तिने आपलाच व्हिडीओ व्हायरल केला होता. याप्रकरणी त्या विद्यार्थिनीवर गुन्हा नोंद करुन चौकशी सुरु करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले आहे.

आमच्या मुली आमचा अभिमान असल्याचे सांगत, या घटनेची उच्चस्तरिय समिती नेमून चौकशीचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितले आहे.

चंदीगड विद्यापीठातील या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, मी प्रशासनाच्या संपर्कात असून सगळ्यांना फक्त एकच विनंती आहे की, याबाबतच्या कोणत्याही अफवा पसरवू नका, आणि त्यावर विश्वासही ठेऊ नका.

यामध्ये ज्या 8 विद्यार्थिनीनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे असे जे वृत्त आहे. या सगळ्या गोष्टी अफवांमधून निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील खरी गोष्टी ही आहे की, यामधील एकाही मुलीने आत्महत्येचा वगैरे प्रयत्न केला नाही, आणि कोणत्याही मुलीला रुग्णालयात दाखल केले नाही.

60 मुलींचा अंघोळ करताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे ही फक्त अफवा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही विद्यार्थिनीचा आक्षेपार्ह असा व्हिडीओ मिळाला नसून ज्या मुलीला अटक केली आहे.

तिचाच एक व्हिडीओ मिळाला असून तिनेच आपलाच व्हिडीओ करुन प्रियकराला पाठवला होता असंही मुख्यमंत्री मान यांनी सांगितले आहे.

चंदीगड विद्यापीठातील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा केली जाईल. या प्रकरणावर विद्यार्थी संघटनेने जोरदार आवाज उठविल्यानंतर त्यांच्यावरही पोलिसांनी लाठीचार्ज केला होता.

हा व्हिडीओ ऑनलाइन शेअर करणाऱ्या विद्यार्थ्यालाही अटक केली आहे. ज्या विद्यार्थिनीने हे व्हिडीओ केले होते, ते सर्व व्हिडीओ शिमल्याच्या एका युवकाला पाठवले होते. त्याने ते सोशल मीडियावर अपलोड केल्याचा आरोप त्याच्यावर केला आहे.

या घटनेनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही ट्विट करुन हा प्रकार आक्षेपार्ह असून व्हिडिओ व्हायरल करणे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणातील सहभागी असलेल्या सर्व दोषींना कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल. तर ज्यांच्यावर हा प्रकार ओढावला आहे, त्या विद्यार्थिनीनी हिम्मत हरू नका असं ट्विटही त्यांनी केले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.